इलेक्टॉनिक्स हे दुकान फोडून 3 लाख 23 हाजार 305 रुपयांचा मुद्देमाल लंपास

जत,प्रतिनिधी;डफळापूर ता.जत येथील स्टँडसमोरील जेटकिंग इलेक्टॉनिक्स हे दुकान फोडून महागड्या 18 एलइडी व इलेक्टॉनिक्स साहित्य असा 3 लाख 23 हाजार 305 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबतचा जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
डफळापूर स्टँडसमोर मुख्य बाजार पेठेत पांडूरंग गुंडा कांबळे यांच्या मालकीचे जेटकिंग इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. मंगळवारी रात्री लाकडी दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यानी आत प्रवेश करत किंमती एलइडी, व इलेक्ट्रानिक साहित्य लांबविले आहे. तालुकाभरातील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्याचे लोणआता डफळापूरमध्ये पोहोचले आहे. त्याबद्दल लोकांत भीतीचे वातावरण आहे.