खलाटी नजिकच्या अपघातात ऊसतोड मजूर व पाच वर्षाचा बालक ठार

0


जत,प्रतिनिधी :जत-सांगली मार्गावर खलाटी फाटा येथे आर के ढाब्याजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन ऊसतोड मजूर जागीच ठार झाला़. तर त्यांच्या सोबत असणारा पाच वर्षीय बालकाचा उपचार सुरू असताना मुत्यू झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहेत. घटना बुधवारी सांयकाळी 5.30 च्या दरम्यान घडली. तुकाराम शामराव हुवाळे (वय-35,रा.व्हसपेठ) हे ठार झालेे. तर त्यांच्यासोबत असणारा त्यांचा मुलगा विकास  (वय-5) व दुसऱ्या दुचाकीवरील सागर मोहन कोळी (वय- 23, रा. खलाटी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर मिरज ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हसपेठ येथील तुकाराम हुवाळे हे ऊसतोड साठी टोळीकडे चालले होते. पत्नी व साहित्य खाजगी वाहनाने पुढे पाठविले होते. ते व पाच वर्षाचा मुलगा दुचाकी वरून सांगलीकडे निघाले होते. खलाटी नजिकच्या आरके ढाब्याजवळ वळणावर त्यांचा अपघात झाला. त्यात तुकाराम जागीच ठार झाले. तर मुलग्यावर मिरज ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मुत्यू झाला.  याबाबत गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.