विवेंकानद स्कूलमध्ये अवरले छ. शिवाजी महाराज, झांशीची राणी,वारकरी,जवान,सावित्रीबाई फुले

0

बालदिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहत संपन्न

डफळापुर, वार्ताहर : डफळापुर येथील विवेंकानद इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये बालदिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहत संपन्न झाल्या. नाविन्यपुर्ण उपक्रमाने नावारूपास आलेल्या स्कूलचे अध्ययना बरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आजची फॅन्सी ड्रेस स्पर्धा त्याचाच भाग आहे.

सकाळी नऊच्या सुमारास स्कूलमध्ये हुबेहुब छ. शिवाजी महाराज, झांशीची राणी,पंढरपूरचे वारकरी,भाजी विक्रेती,जवान,मोबाईल,परी अशा ड्रेस मध्ये विद्यार्थी अवतरले.शिक्षकासह,बघनारे सगळेच आवाक् झाले. आज स्कूल परिसरात वेगळे विश्व आवतरले होते. जवळपास सगळेच विद्यार्थी वेगवेगळे ड्रेस परिधान करून आले होते.बालदिनानिमित्त वेगळेपण जपत स्कूलच्या वतीने गावातून फेरी काढून जागृत्ती करण्यात आली. स्कूलच्या मुख्याध्यापक,शिक्षकासह पालकांनी कष्ठ घेतले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.