भाजपमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस ; विक्रम सांवत

0
5

डफळापूर : भाजपने जनतेचा भम्रनिराश केला आहे. त्यामुळे जनमानसात भाजपविषयी तिव्र असंतोष व्यक्त होत आहे. नोटबंदी,जिएसटी, कर्जमाफीत सामान्य जनतेला वेठीस धरण्यामुळे अर्थकरण ढासळले आहे. भाजपकडून विकासाचे गाजर दाखवत फसविले आहे. अशी टिका कॉग्रेेेस नेते,तथा जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांनी केली. सांगलीतील जनआक्रोश अंदोलनाच्या निमित्ताने तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीन तालुकाभर बैठका घेण्यात येत आहेत.त्यावेळी सांवत बोलत होते. सोमवार सहा रोजी सांवत यांनी जत पश्चिम भागातील डफळापूर, बाज,अंकले,शिंगाणापूर,मिरवाड,जिरग्याळ आदि भागात बैठका घेण्यात आल्या. कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पाराय बिराजदार, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, उपाध्यक्ष कुडलिंक दुधाळ,बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, माजी सभापती आकाराम मासाळ, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब माळी, भारत गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here