आमदाराची आकडेवारी चुकीची, 41 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता : विक्रम सांवत

0

आमदाराची आकडेवारी चुकीची, 41 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता : विक्रम सांवत

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कॉग्रेेेसनेच वर्चस्व मिळविले आहे. जत तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीवर आमचे संरपच व सत्ता आली आहे. प्रत्यक्षात भाजपच्या 22 ग्रामपंचायती असतानाही भाजप आमदार विलासराव जगताप हे भाजपचेच 36 ठिकाणी भाजपचे संरपच झाल्याचे बिनबुडाचे आरोप करत आहेत.आमच्या ताब्यातील ग्रामपंचायतीची यादी आम्ही पत्रकारांना दिली आहे. त्यांचे वाचन करून आमदारांनी आकडेवारी अभ्यास करावा व भाजपच्या आमदारांनी आमचा राजीनामा मागण्यापे क्षा भाजप पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून राजिनामा द्यावा असे आवाहन जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांनी केले.

सांवत म्हणाले,गत निवडणूकीत भाजपने आश्वासने पाळली नाहीत. उलटपक्षी नोटाबंदी,जिएसटी,व कर्जमाफीत शेतकरी, नागरिकांना त्रास दिला आहे. त्यामुळे भाजपचे रिटर्न प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. जिल्हासह तालुका भरात कॉग्रेेेसला मोठे यश मिळाले आहे. ते कॉग्रेसच्या संघटीत ताकतीचा विजय आहे. मात्र भाजप आमदारांना कॉग्रेसचा विजय दिसत नाही. आकडेवारीच्या घोळात ते भाजपच्या ग्रामपंचायती आल्याचे सांगत आहे. मात्र त्यांना आम्ही आमच्या विजयी ग्रामपंचायतीचे यादीच देत आहोत. 

Rate Card

सांवत म्हणाले, भाजप सरकारने म्हैशाळ योजना राजकीय फायद्यासाठी वापर केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी आदी म्हैशाळ योजना सुरू केली, निवडणूकीनंतर बंद केली.ती ग्रामपंचायत निवडणूकी अगोदर सुरू केली. व निकाल लागताच पाणी बंद केले आहे. आमदार निधी आणल्याचा दावाही बोगस आहे. कॉग्रेसच्या ग्रामपंचायती अंतराळ,बनाळी, लोहगाव, दरीबडची, कारजगी,तिल्याळ, काराजनगी,गिरगाव, कोसारी,बिरनाळ, हळ्ळी, लकडेवाडी, येळवी, आंवढी, बागलवाडी,कोळगिरी, दरिकोणूर, बेळोडगी, सोरडी,अचकनहळ्ळी, बसर्गी, प्रतापूर, नवाळवाडी, करेवाडी को.बो.,सुसलाद,लंवगा,सालेगिरी-पाच्छापूर,बागेवाडी, मिरवाड, खलाटी, वज्रवाड, खंडनाळ, धुळकरवाडी, कागनरी, बेंळूखी,वायफळ, जिरग्याळ,वाषाण, माडग्याळ,बेवनूर, मोकाशवाडी (बिनविरोध) 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.