‘स्टॉप कॅन्सर’ची जनजागृती

0

‘स्टॉप कॅन्सर’ची जनजागृती

Image result for कैंसर

कर्करोग अर्थात कॅन्सर आपल्या देशात थैमान घालायला लागला आहे. 2008 मध्ये हा आपल्या देशात आठव्या क्रमांकावर होताआज तो दुसर्या स्थानावर आहे. 200 प्रकारचे कर्करोग लोकांना होतातप्रत्येक तिसर्या माणसाला कर्करोग गाठत असून सगळ्यात वेगाने हा रोग आपल्या देशात फैलावत चालला आहेवेळीच याला आवर घातला नाही आणि जनजागृतीबरोबरच अॅक्शन प्लॅन राबवला गेला नाही तर घरटी एकदोन रुग्ण कर्करोगाचे दिसतीलस्टॉप कॅन्सर मिशन मल्टीपर्पज सोसायटीचा कॅन्सर समुपदेशक विजय मानकर सांगत होतातेव्हा जिरग्याळ(ता.जतमधल्या प्राथमिक शाळेत कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले शिक्षक अगदी जीव कानात आणून ऐकत होते.नागपुरातली ही सामाजिक संस्था सध्या राज्यभरातल्या शाळांमध्ये जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कर्करोगाबद्दल जागृतीचे काम करत आहेमानकर सांगत होताआम्ही आतापर्यंत राज्यातल्या 30 जिल्ह्यांमधल्या शाळांमध्ये जाऊन कॅन्सरबाबत जागृती करण्याचे काम केले आहेसाम्गली जिल्हा हा शेवटचा जिल्हा राहिला आहे. 13 तारखेला हाही जिल्हा पूर्ण होणार आहेमात्र तो जी कॅन्सरची आपल्या देशातली भयावस्था सांगत होता,तेव्हा उपस्थितांमध्ये एक प्रकारची भितीची लकेर उमटत होतीशेवटी सर्व शिक्षकांनी आपले कुटुंब या भयानक आजारापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केलाआपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या शाळेतल्या मुलांनात्यांच्या पालकांना जागरूक करूअसाही त्यांनी निश्चय केला.

मानकरच्या बोलण्यातून आणखी एक माहिती उघड झाली ती म्हणजे या रोगाविषयीचा जनजागृतीचा अभावत्यांचे म्हणणे 0.1 टक्का फक्त जनजागृती केली जाते.ही आकडेवारी म्हणजे काहीच नाही.म्हनजे आपल्या जागृती पातळीवर फार मोठी मोहीम राबवण्याची गरज आहेशिवाय ही जागृती केल्यानंतर जी अॅक्शन घ्यायला हवी ती घेतली जात असल्याने या रोगाचा प्रसार वाढला आहे. 10 टक्के जनजागृती झाली तर प्रत्यक्ष कार्यवाही ही 90 टक्के व्हायला हवी कॅन्सर आटोक्यात येणार आहेमुळात हा रोग होऊ नये,यासाठी अधिक काळजी घेतली पाहिजेयासाठी वेळोवेळी आपल्या शरीराची संपूर्ण तपासणी करून घ्यायला हवीकारण या तपासणीमुळे आपल्या शरीरात प्राथमिक अवस्थेत कोणकोणते आजार,रोग आहेत,याची कल्पना येते नी आपण त्याच्यापासूनच्या बचावासाठी प्रयत्न करायला लागतोकॅन्सर म्हणजेच कर्करोग हादेखील प्राथमिक अवस्थेत असेल तर तो बरा करता येतोप्रसिद्ध क्रिकेटपटू युवराजसिंगअभिनेत्री मनीषा कोईराला यांना तो बरा करता आला,त्याला कारण म्हणजे हा रोग प्राथमिक अवस्थेत असल्याचे निदान त्यांना लवकर कळलेदुसर्यातिसर्या टप्प्यात हा रोग गेल्यास वाचण्याचे चान्सेस फारच कमी आहेत.त्यामुळे हा रोग होऊ नये,यासाठी आपली जीवनशैली सुधारली पाहिजेच पण वेळोवेळी तपासण्या या करायलाच हव्यात.

Rate Card

वर आपण पाहिले कीजवळपास 200 प्रकारे कर्क रोग जगभरातल्या लोकांना होत असल्याचे आढळून आले आहेत्यामुळे तो  क्लिष्ट आहेच आणि त्यावरचा उपचारही कठीण आणि महागडा आहेत्यामुळे आपल्याला त्याच्यापासून सावध राहणे,हेच आपल्या भल्याचे आहेसाधारणत:कर्करोग (कॅन्सरहा धुम्रपान केल्याने आणि तम्बाकूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतोमद्यपान केल्यानेशरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्याने होतो.खाण्यापिण्याच्या सवयीदेखील कारणीभूत आहेत.मानसिक तणाव,ॅसिडीटीअतिप्रखर सूर्य किरणे अशा किती गोष्टींमुळे लोक कॅन्सरच्या विळख्यात सापडतात.या गोष्टी टाळल्या तर आपन यापासून बचावू शकतो.यासाठी आपल्याला महत्त्वाचे म्हणजे आपली जीवनशैली बदलली पाहिजेशरीर सतत क्रियाशील ठेवण्याबरोबरच आपल्या शरीराला घातक ज्या गोष्टी आहेत,त्या टाळल्या पाहिजेतत्यापासून दूर राहिले पाहिजे.फास्टफूडला रामराम ठोकला पाहिजेरोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे अन्नघटक आपल्या शरीरात जायला हवेतअशी व्यवस्था करायला हवीयोगा,व्यायाम याकडे लक्ष द्यायला हवेआणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला विचार सकारात्मक ठेवला पाहिजेचांगला विचार केला पाहिजेआपल्यासह दुसर्यांचे चांगले चिंतले पाहिजे.निरपेक्ष भावनेने काम करत राहिल्यास चांगला फायदा होतो.

आपल्या देशातील सर्वच वयोगटातील लोकांना कॅन्सर (कर्करोगहोतोस्त्रिया याला अधिक बळी पडत आहेत.छातीचा,फुफ्फुसाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर महिलांमध्ये अधिक प्रमाणात होत आहेलहान मुलांनाही तो होत आहेहा रोग काही प्रमाणात अनुवंशिकही आहेमात्र प्राथमिक अवस्था आपल्या लक्षात आली तर आपण त्याच्यापासून बचाव करू शकतो.त्यामुळे आपल्या शरीराच्या वेळच्यावेळी तपासण्या करायला विसरू नकाआनंदी राहासकारात्मक दृष्टीकोन ठेवून वागाशरीराला घातक असणार्या गोष्टींपासून दूर राहाम्हणजे हा भयानक कॅन्सर तुमच्या आसपासही फिरकणार नाही.

मच्छिंद्र ऐनापुरे,जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.