राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे दिपावलीसाठी बिलाची रक्कम प्रतिटन रुपये २७५/- प्रमाणे बॅक खात्यावर जमा
इस्लामपूर, (प्रतिनीधी);
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे साखराळे, वाटेगाव–सुरुल व कारंदवाडी युनिटकडे गळीत हंगाम २०१६–२०१७ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये २७५ प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम रुपये ३६ कोटी ६१ लाख रुपये ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याच्या बॅक खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
कारखान्याने गळीत हंगाम २०१६–१७ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन पाहिला हप्ता रुपये २७९०/- दिला होता. दुसरा हप्ता रुपये १५०/- या पुर्वी अदा केलेला आहे. तसेच दिपावलीसाठी प्रतिटन रुपये २७५/- प्रमाणे दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ रोजी बॅकेत वर्ग केलेला आहे. गळीत हंगाम २०१६–२०१७ मधील गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन रुपये ३२१५/- ऊस उत्पादकाना दिलेले आहेत. तसेच कारखाना सभासदाना ऑक्टोबर महिन्यापासून रुपये २ या दराने ७ किलो व दिपावलीस ७ किलो साखर सभासदाना कारखान्याने चालू केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यानी आपला सर्व ऊस कारखान्यास पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक सर्वश्री विराज शिंदे, श्रीकांत कबाडे, दिलीप पाटील, ए. टी. पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली सचिव प्रतापराव पाटील, चिफ अकोंटट अमोल पाटील, व्यवस्थापकीय आधिकारी व्ही. बी. पाटील उपस्थित होते.