बेंळूखीच्या गतिमान विकासाठी श्री. सिध्दनाथ व संदानंद बहुजन ग्रामविकास शेतकरी पँनेलला विजयी करा : शशिंकात जाधव

0

बेंळूखीच्या गतिमान विकासाठी श्री. सिध्दनाथ व संदानंद बहुजन ग्रामविकास शेतकरी पँनेलला विजयी करा

: शशिंकात जाधव,सुधाकर माळी

डफळापूर, वार्ताहर : बेंळूखीच्या सर्वागिंन विकासासाठी व स्वच्छ, पारदर्शी,लोकानुभूक ग्रामपंचायतीचा कारभार करण्यासाठी श्री. सिध्दनाथ व  संदानंद बहुजन ग्रामविकास शेतकरी पँनेलच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा असे प्रतिपादन पँनेल प्रमुख शशिंकात जाधव,सुधाकर माळी यांनी पँनेलच्या प्रचार शुभारंभ प्रंसगी केले.श्री. सिध्दनाथ व बुवानंद बहुजन शेतकरी विकास पँनेलच्या प्रचाराचा नारळ खलाटी येथील श्री. लकाबाई मंदिरात विविध मान्यवराच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी लक्ष्मण माळी,सिंगू अनुशे,संभाजी चव्हाण, विलास बाबर, महादेव माळी,वसंत म्हमाणे,दिलिप चंदनशिवे,शिवाजी माने,आण्णाप्पा गबुरे,सदाशिव चौगुले, वंसत पाटील,ज्योती कदम, तानाजी चव्हाण,अकुश चव्हाण,शहाजी शिंगाङे,दत्ता शिंगाङे,प्रकाश पाटील,सदाशिंव ब्रेरङे,आप्पासाहेब जगताप आदि मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

जाधव पुढे म्हणाले,बेंळूखी विकास करायचा म्हणून गेल्या दहा वर्षापासून आम्ही सत्ता मिळविली. मात्र काहींनी या सत्तेचा दुरूउपयोग करून ग्रामपंचायत खाजगी मालमत्ता केली आहे. ज्यांनी गट बळकट केला. ज्यांची सर्व ताकत यासाठी खर्ची केली. त्यांना त्यांचे सत्तेच्यां धुदींत नेतृत्व नको वाटू लागले. गावचा विकास व  विविध प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी किंबहुंना आम्हीच निवडणून आणलेले सत्तास्थानी असणारे लोकप्रिनिधी मनमानी करून स्वंयघोषीत कारभार करू लागले. त्यामुळे बेंळूखीचा विकास रखडला आहे. त्याला गतिमान करण्यासाठी व बेंळूखीत विकास प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सक्षम उमेदवार उभे केले आहे. आमच्या सर्व लोकमताचे उमेदवारांना मोठा प्रतिसाद लाभ आहे. त्यामुळे यावेळी विजयी आमचाच असल्याचा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

सिध्दनाथ व बुवानंद बहुजन शेतकरी विकास पँनेलच्या प्रचाराचा नारळ खलाटी येथील श्री. लकाबाई मंदिरात विविध मान्यवराच्या उपस्थित करण्यात आला. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.