भेसळयुक्त दुधाचा राजरोस गोरखधंदा..!

0
Post Views : 8 views

भेसळयुक्त दुधाचा राजरोस गोरखधंदा..!

संबधित विभागाच्या अर्थपुर्ण सहयोगाने जनतेच्या आरोग्याशी खेळ : वेगवेगळ्या दराने दुधाची विक्री

Rate Card

जत,(का.प्रतिनिधी) : दूध पातळ यायला लागलं, अशी तक्रार करताच दूध विक्रेते गृहिणींना दूधवाला बदलविण्याचा सल्ला देतात. पण दुधाच्या दर्जात बदल करीत नाही. सध्या दूध विक्रेत्यांजवळ महाग आणि स्वस्त असे दोन प्रकारचे दूध सहजपणे उपलब्ध असतात. स्वस्त दुधाचा दर्जा तपासण्याची तसदी प्रशासन अधिकारी घेत नाहीत. दुधाचा हा धंदा एवढा राजरोस झाला आहे की, चांगल्या दुधाच्या कमतरतेमुळे जिल्हातील येथून सत्तर ते पंच्चाहत्तर किलोमीटरहून शहरात शेकडो दुधाचे पाकिटे विक्रीस येतात. 40 रूपये प्रतिलीटर दराने मिळणारे हे दूध मोफत उपलब्ध असलेल्या गायरानातील चार्‍यांमुळे परवडते, असा संबंधित दूध विक्रेत्यांचा युक्तिवाद आहे.
दुधात भेसळ करून ते विकणारे मात्र हा नफ्याचा धंदा सराईतपणे करीत असून त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. पर्याय नसल्याने लोकांनीही हा दैनंदिन कार्यक्रम मुकाट्याने मान्य केला आहे.यावर्षी पाच ऑगस्ट रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने भेसळीची गंभीर दखल घेऊन दुधाची भेसळ करणार्‍यांना जन्मठेपच हवी, असे म्हटले आहे. बहुतांश लहान मुलांचा आहार असलेले दूध किती शुद्ध आणि भेसळमुक्त आहे, हे कुणीही सांगू शकत नाही. दुधातील भेसळ ओळखण्याची कोणतीही उपाययोजना नाही. प्रशासन अधिकार्‍यांना आपल्या कर्तव्याची जाणीव नाही. महाग दूध परवडत नाही म्हणून त्यात पाणी टाकून विकावे लागते, असा दूधविक्रेत्यांचा जाब आहे.
राज्यात दूधाच्या भेसळीला फक्त सहा महिन्याची कैद अथवा हजार रुपये दंडाची शिक्षा आहे. भादंविचे कलम  272 नुसार ही तरतूद असून याची अंमलबजावणी कधीच होत नाही, असा दंड आणि कैद कुण्या दूध विक्रेत्याला झाल्याचे कुठेही ऐकीवात येत नाही अथवा त्याची बातमी येत नाही. यावरून दूध भेसळीचा प्रकार समाजाने स्वीकारल्याचे निदर्शनास येते. मात्र दिवसेंदिवस दुधाच्या भेसळीला आळा घालण्यासाठी शिक्षेच्या अंमलबजावणीचा स्पष्ट संदेश समाजात जाणे आवश्यक आहे.भेसळ ओळखण्याची यंत्रणा सक्रिय हवी;प्रशासकीय यंत्रणेचा वचक नसलेल्या भागात भेसळयुक्त व पाणी, युरिया,विविध पदार्थ घालून दूध सर्रास विकले जाते. सामूहिक जनजागृती व दक्षतेने हा प्रश्न सुटू शकतो. शहरात येणारे दूध तपासण्याचे नाके ठिकठिकाणी उघडणे व दूध विक्रेत्याला तपासणी अनिवार्य करणे, भेसळ तपासणीचे कीट घरोघरी देणे आदी भेसळ ओळखण्याच्या यंत्रणा यासाठी सक्रिय करणे गरजेचे आहे. बेमालूमपणे मिसळले जातात दुधात रसायने
घातक रसायने, कास्टिक सोडा, डिटर्जंट वापरून भेसळीचे दूध तयार होते. मोठ्या महानगरात असे दूध सर्रास विकले जातात. या नेटवर्कला बिनबोभाट चालविण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना मोठा रोजगार पुरविला जातो. दुधाच्या विविध ठिकाणच्या नमुन्यापासून हे वारंवार सिद्ध झाले आहे. पाऊच मधील शॉम्पू ताटावर वारंवार घासून त्यावर युरियाचे पाणी टाकतात. हे फेसाळ मिश्रण बेमालूमपणे दुधात मिसळून त्याचा साठा वाढविला जातो. असे प्रकार जत तालुक्यातील डफळापूर,शेगाव,कुंभारी,बिंळूर भागातील दुध संकलन करणाऱ्या डेअरी चालकाकडून राजरोसपणे सुरू आहे. अनेक सायकल वर दुध गोळा करणारे दुध डेअरी काढून अशा भेसळीतून लाखो रुपये कमवत आहेत. तर याच पैशातून शेतकरी पहाटे पासून राबून दुध घालण्यासाठी डेअरीत सायकल वर येतोयं तर दुसरीकडे सायकल वरून फिरणारे केंद्र चालक चारचाकी वाहनाशिवाय फिरत नाहीत हा मोठा विरोधी भास जत तालुक्यातील अनेक गावात दिसतो

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.