वळसंग ग्रामपंचायतीच्या तीन महिला सदस्यांचे सदस्यत्व रद्द

0
Post Views : 2 views

वळसंग ग्रामपंचायतीच्या तीन महिला सदस्यांचे सदस्यत्व रद्द

वळसंग, वार्ताहर:

वळसंग (ता.जत) येथील ग्रामपंचायतीच्या तीन महिला सदस्यांनी पदाचा वैयक्तिक कामासाठी गैरवापर करत शासकीय योजनेचा लाभ घेतला या आरोपाखातेर सरपंच सदाशिव कांबळे यांच्या अपीलाला जिल्हाधिकारी यांनी सुनावणी करत या उपरोक्त सदस्या यल्लव्वा दऱ्याप्पा कोळी, मालन बसागोंडा मुचंडी व नकुसा उमेश बंडगर या तिन्ही सदस्यांना अपात्र ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द केले.

Rate Card

वळसंगमधील भाजप प्रणित अॅड. एम.के.पुजारी व काँग्रेस प्रणित सतिश चव्हाण हे आघाडीचे राजकीय गट असून गेल्या 9 सदस्यासाठी सन 2015 च्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चव्हाण गटाचे 6 तर पुजारी गटाचे 3 सदस्य निवडून आले होते. परंतु सरपंच पद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव होते.परंतु चव्हाण गटाकडे राखीव वर्गाचा सदस्य नसल्याने सरपंच पद पुजारी गटातील सदाशिव कांबळे यांच्याकडे गेले.कालांतराने गावपातळीवरच्या संघर्षात्मक राजकारणाची चिन्हे स्पष्ट होत गेली, आणि यांत आपले सदस्य जास्त असून वर्चस्वी सरपंच पद विरोधी गटाकडे गेल्याने चव्हाण गटाकडून सदाशिव कांबळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर कांबळे यांनी चव्हाण गटाच्या वरील तिन्ही सदस्यांनी पदाचा गैरवापर करत शासकीय लाभार्थी झाल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते.सदर तक्रारीच्या सुनावणीत जिल्हाधिकारी यांनी या तिन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. या तीन सदस्यांच्या अपात्रतेनंतर व चव्हाण गटाच्या एका सदस्याने अगोदरच राजीनामा दिल्याने चव्हाण गटाकडे दोन तर पुजारी गटाकडे तीन अशी सदस्यसंख्या राहिली आहे.त्यामुळे पुढील संरपच निवड कशी होणार हा औत्सुक्याचा विषय आहे.

“…मग अच्छे दिन कधी येणार :जनता”

या राजकीय शह आणि कटशह पूर्ण राजकारणात गावच्या विकासाला धक्का लागतो का ?, आगामी ग्रामदैवत यात्रा आणि दिवाळीच्या तोंडावर असे राजकीय वळण गावाला पोषक आहे का? ते कोठे नेहणार? जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर गावचे अच्छे दिन कधी येणार अशी बोचक चर्चासत्र जनतेत सुरु आहे. त्यामुळे राजकीय जिरवाजिरवी पेक्षा गाव विकासाला महत्व द्यावे अशी रास्त मागणी नागरिकातून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.