माडग्याळ रुग्णालयात दोन कर्मचाऱ्यांत सिनेस्टाईल हाणामारी वादग्रस्त पुरूष व महिला कर्मचारी रूग्णासमोर भिडले : चौकशीचे आदेश

0
Post Views : 4 views

माडग्याळ रुग्णालयात दोन कर्मचाऱ्यांत सिनेस्टाईल हाणामारी

वादग्रस्त पुरूष व महिला कर्मचारी रूग्णासमोर भिडले : चौकशीचे आदेश

Rate Card


माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालयात एक पुरूष कर्मचारी व एका महिला कर्मचा-यामध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. रुग्णालयात रुग्णांच्या साक्षीने घटना घडल्याने रुग्ण,कर्मचारी,व गावात उलट सुलट चर्चा चालू आहे.याबाबत रुग्णालयाच्या वरिष्ठांकडे विचारणा केली असता,त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र झाल्या प्रकाराने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या भानगडी चव्हाट्यावर आल्या आहेत. यावर जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे. घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी व रग्णाकडून मिळालेली माहिती अशी कि, रुग्णालयात दोन कर्मचाऱ्यांची काही दिवसापुर्वी जत ग्रामीण रुग्णालयातून या दोन्ही वादग्रस्त कर्मचा-यांची बदली जत मधून देवगड व गगनबावडा येथे झाली होती.पण आरोग्य विभागात अशा लोकांची सोय चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे या दोघांनी मंत्रालय स्तरावर सेटिंग लावून पुन्हा माडग्याळ येथे बदली करून घेतली आहे.त्यांच्यातील शासन होऊनही वाद धुमसत होता.तो सोमवारी दुपारी रुग्णालयात दोघात बोलता बोलता काही विषयावर वाद चव्हाट्यावर आला,दोघांनीही मर्यादा सोडून उपस्थित रुग्णासमोरच एकमेकावर हात उचलला.प्रकार बघून उपस्थित रुग्णांची व कर्मचाऱ्यांची चागलीच भंबेरी उडाली.सोमवारी महात्मा गांधी जयंती निमित्त वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नव्हते.  रुग्णाची संख्याही तुरळक होती.कर्मचाऱ्यांत गप्पाचा फड रंगला होता. गप असताना बोलत -बोलत वादग्रस्त विषयी चर्चा सुरू असताना दोघांत किरकोळ विषयावरून वाद झाला. वादाचे टोकाला जात हाणामारी सुरू झाली. अचानक घडलेल्या या प्रकरणाने कर्मचारी वर्गात चांगलीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.काहीनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही ऐकण्याच्या मनस्थितित नव्हते. उपस्थित रूग्णांकडून ही बातमी बाहेर समजल्यावर रुग्णालयात ग्रामस्थ जमा होऊ लागल्यावर दवाखान्यात शांतता पसरली.रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकिस्तक यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले. दिवसभर मात्र या घटनेची माडग्याळ व परिसरात खमंग चर्चा सूरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.