शिवसेनेचा लढा गोरगरीबांसाठी; लाटेची पर्वा आम्हाला नाही चणे देणार पण तुमचे दात पाडणार, उद्धव ठाकरेंची टीका

0

शिवसेनेचा लढा गोरगरीबांसाठी; लाटेची पर्वा आम्हाला नाही

Rate Card

मुंबई;मोठ्य़ा आशेने अपेक्षेने एखादं नवसाचं बाळ असावं तशी जनता तुमचे लाड करत होती, तुमच्यावर प्रेम करत होती. पण नवसाचं बाळ वाह्य़ात होत चाललंय. नको ते उद्योग करतंय. हे जर त्यांच्या लक्षात यायला लागले आहे. असा जबरदस्त घणाघात करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर तोफ डागली. केंद्रामध्ये एकहाती सत्ता, इकडे सत्ता, तिकडे सत्ता पण कारभार मात्र बेपत्ता! अशा शब्दांत भाजपचे वाभाडे निघताच अवघे शिवतीर्थ हंशा आणि टाळ्य़ांनी उसळून गेले.शिवसेनेचा अतिविराट दसरा मेळावा आज शिवतीर्थावर प्रचंड जल्लोष आणि अपूर्व उत्साहात साजरा झाला. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला दिशा देणारे भगवे तुफानच येथे घोंगावले. शिवसेना झिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा गगनभेदी घोषणांनी अवघे शिवतीर्थ निनादून गेले होते. जेथे पहावे तेथे डौलाने फडकवणारे भगवे झेंडे आणि भगव्या रक्ताचे शिवसैनिक… आणि याच जनसागराला ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो’ अशी साद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घालताच टाळ्य़ांचा एकच कडकडाट झाला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा तर टराटरा फाडलाच पण बुलेट ट्रेन, महागाई, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यावर धारेवर धरले. उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे बंदुकीतून सुटलेली ‘बुलेट’च होती… गोरगरीबांचं जगणं मुश्कील करणाऱ्यांची छाताडं फोडणारी!शुक्रवारी परतीच्या पावसाने शिवतीर्थावर अक्षरशः चिखल केला. तोच संदर्भ पकडून उद्धव ठाकरे म्हणाले, चिखल केवळ या मैदानातच नाही तर देशाच्या कारभाराचाच चिखल झालाय. कमळ चिखलातून उगवते, पण येथे तर फक्त ‘मळ’ दिसतोय, कमळ दिसतच नाही. उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडू लागली होती…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.