माडग्याळमध्ये प्रसिध्द दसरा मोठ्या उत्साहत संपन्न

0

माडग्याळमध्ये प्रसिध्द दसरा मोठ्या उत्साहत संपन्न

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथे सालाबाद प्रमाणे दसरा महोत्सव मोठ्या उत्साहत पार पडला.नऊ दिवस सुरू असलेला देवीच्या नवरोत्सवाची सांगता देवीच्या भव्य मिरवणूकीने व सिमोल्लंघनाच्या कार्यक्रमाने पार पाडण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. माडग्याळ मध्ये नवरात्र उत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहत साजरा केला जातो.घटस्थापनेदिवशी तुळजापूर येथून देवीची ज्योत आणली होती.हि पंरपरा दरवर्षी प्रमाणे कायम जपली. विविध कार्यक्रम आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी देवीची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील गावे वाड्यावस्त्यावरील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित असतात.मिरवणूकी नंतर अंबाबाई मंदिर येथे सिमोल्लंघनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री. खंडोबा देव व अंबाबाई देवीची पालखी भेट सोहळा संपन्न झाला.

Rate Card

माडग्याळ: येथे ऐतिहासिक दसरा महोत्सव सांगता संरभारभास जमलेला मोठा जनसमुदाय.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.