नगरपालिकेची चौकशी जरूर करा,तशीच मनरेगातून झालेल्या महाघोटाळ्याचीही चौकशी करावी : इकबाल गंवडी

0

नगरपालिकेची चौकशी जरूर करा,तशीच मनरेगातून झालेल्या महाघोटाळ्याचीही चौकशी करावी : इकबाल गंवडी

जत,प्रतिनिधी : जत शहरातील भष्ट्राचाराची जरूर चौकशी करावी,पण त्याचबरोबर भाजपच्या सक्रीय 

पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत केलेला कोट्यावधीचा भष्ट्राचाराचीही चौकशी करा म्हणजे कळेलं कोन किती पाण्यात आहे ते, नगरपालिकेत चांगला अधिकारी असल्यामुळे जतचा नावलौकिक वाढला आहे. त्यांच्या कामामुळे नगरपालिकेला स्वच्छता अभियांनाचे एक कोटीचे बक्षिस मिळाले आहे.त्याच मुख्याधिकाऱ्यांंवर वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित असताना दमदाडी, दमकी देणाऱ्या एका नगरसेवकाच्या कृत्यावर पाघरूंन घालण्यासाठी अट्टाहास चालू आहे.असा आरोप करणाऱ्यानांची स्वता:चे बघावे असा आरोप नगराध्यक्ष इकबाल गंवडी यांनी पत्रकार बैठकीत केला.

यावेळी उपनराध्यक्ष श्रींकात शिंदे, नगरसेवक महादेव कोळी,परशूराम मोरे उपस्थित होते.

Rate Card

गंवडी पुढे म्हणाले, जत नगरपालिकेत मोठा भष्ट्राचार झाल्याचा आरोप करत आहेत. त्यांची चौकशी करा त्यात काळभेर असेलतर कारवाई करावी, त्याबद्दल आमचे दुमत नाही. मात्र हे करताना भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांने नगरपालिकेत अनेक कामे घेऊन रखडवली आहेत.अनेक वेळा आम्ही त्यांना नोटिसा दिल्या आहेत.तरीही कामे सुरू नाहीत, त्याची चौकशी करावी. तसेच जत पंचायत समितीकडून झालेल्या मनरेगा घोटाळ्यात अनेक भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांचे होमगाऊंड असणाऱ्या गावात मनरेगातून मोठी व बोगस कामे झाली आहे. तेथे मोठा भष्ट्राचार झाला आहे. त्या गावातील कामाची चौकशी करावी. म्हणजे कोन पारदर्शी आहे जनतेला समेल.

गंवडी म्हणाले, जत नगरपालिकेला चांगला मुख्याधिकारी मिळाल्याने गेल्या वर्षात मोठी विकास कामे झाली आहेत. स्वच्छता ठेका,गटारीचे कामे,करवसुली,शौचालये कामे चांगली झाली आहेत. कतृत्वदक्ष अधिकारी लाभल्याने हे शक्य झाले आहे. दुसरीकडे कामे घेऊन रखडवली, पुऩ्हा अपेक्षा यामुळे काही नगरसेवकांचा थयथयाट चालू आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वकाही होत आहे. जनता सुज्ञ आहे. ते जागा दाखवतिल. विकास काय झाला हे जनतेला माहित आहे. असेही शेवटी गंवडी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.