ग्रामपंचायत निवडणूक : गुरूवारी अर्ज भरण्यासाठी तुफान गर्दी
ग्रामपंचायत निवडणूक : गुरूवारी अर्ज भरण्यासाठी तुफान गर्दी
संरपच 103,सदस्यासाठी 544 अर्ज दाखल

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 81 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पाचव्या दिवशी उमेदवारीनी सर्वाधिक नामनिर्देशनपत्र सादर केली. त्या थेट संरपच पदासाठी 103,सदस्यासाठी 544 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पावसामुळे गुरूवारी उशिरापर्यत अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हाअधिकारी कळमपाटील यांच्या सुचनेनुसार अर्ज स्विकारण्याची रचना बदलली आहे. काही गावचे बुथ उघड्यावर तयार केले होते. गुरूवारी दुपारी अचानक पाऊस आल्याने उघड्या बुथवर अडचणी आल्या होत्या.आज शेवटचा दिवस असल्याने मोठी गर्दीत होणार आहे. शिवाय पुन्हा पाऊस आल्यास अडचणी सामना करावा लागणार आहे. एंकदरीत गुरूवार अखेर थेट संरपच पदासाठी 221, सदस्य पदासाठी 1050 अर्ज दाखल झाले आहेत.
जत : पावसामुळे रात्री उशिरा पर्यत साडे चारच्या अगोदर निवडणूक कक्षात अालेले अर्ज स्विकारले.