उटगीत सायकल दुकान अज्ञातानी बुधवारी रात्री पेटविले.
उटगीत सायकल दुकान अज्ञातानी बुधवारी रात्री पेटविले.
उटगी, वार्ताहर: उटगी(ता.जत) येथील मिरासाब बिळूंर यांचे सायकल,व मोटारसायकली दुरूस्थीचे दुकानाचे खोक्याची बुधवारी रात्री अज्ञात इसमांकडून जाळपोळ करून खोके जाळण्यात आल्याची फिर्याद मिरासाब बिळूंर यांनी उमदी पोलिसात दिली आहे.

गरिब असणाऱ्या मिरासाब यांचे रस्त्यालगत खोके होते. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबीयांचे जगण्याचे साधन होते. तेच खोके जळून खाक झाल्याने मिरासाबच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. आगीत नव्वद हाजाराचे नुकसान झाले आहे.मिरासाब यांचे खोके जाळणाऱ्या आरोपीना तातडीने पकडून कारवाई करावी अशी मागणी ग्रा. प. सदस्य आप्पासाब तेली यांनी केली आहे.