डफळापूराच्या मिनी मंत्रालयावर सत्ता मिळविण्यासाठी महायुध्द सुरू

0

डफळापूराच्या मिनी मंत्रालयावर सत्ता मिळविण्यासाठी महायुध्द सुरू

डफळापूर, वार्ताहर : नव्याने होऊ घातलेल्या थेट संरपच निवडीमुळे सदस्यांचे वजन कमी झाल्याचा व महिला आरक्षणामुळे डफळापूर सह परिसरातील पॅनेलवर प्रमुखांना सक्षम उमेदवार देताना कस लागत आहे. वाढलेला भष्ट्राचार, निवडून आल्यानंतर संरपच, उपसंरपच व पॅनेल प्रमुखाच्य दादागिरीने सदस्यांचे म्ह

Rate Card

णणे गृहीत धरले जात नाही. त्यामुळे निवडणूक लढताना मतदारांना सदस्यांना व्यक्तिगत पातळीवर दिलेली आश्वासनेही सदस्य पुर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे सदस्य होण्यासाठी अनेकांना ना आहे. परिणामी सक्षम महिला व आरक्षणनुसार उमेदवार शोधताना पॅनेल प्रमुखांना उमेदवार तयार करण्यासाठी आश्वासनाचा भडिमार करावा लागत आहे. तरीही सध्याकांळी तयार झालेल्या उमेदवार दुसऱ्या दिवशीपर्यत नकारघंटा वाजवत आहेत. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. डफळापूर ग्रामपंचायतीच्या 17 पैंकी 9 महिला व आरक्षणनुसार उमेदवार शोधताना नेत्याचा कस लागला आहे. ऐनवेळी पुढचे उमेदारांच्या तोडीचा उमेदवार देताना अनेकांचे उंबरे झिझविण्याची वेळ आली आहे. तरीही उमेदवार मिळत नसल्याची ओरड आहे.अंतिम क्षणापर्यत तोडीस तोड उमेदवार देताना नेत्यांना मोठी मनधरणी करावी लागणार आहे.डफळापूर सारख्या ताकतवान गावचे सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्यासाठी अनेक जुने नवे बाहुबली मैदानात उतरले आहेत. कॉग्रेसकडून तुल्यबंळ उमेदवार देताना बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, सोसायटी चेअरमन मनोहर भोसले,जयराज शिंदे, बाबासाहेब माळी यांचा कस लागणार आहे. ऐन वेळी स्वच्छ चेहरा असलेले दत्त पंतसस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांनी निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतल्याने त्यांचे बंळ वाढले आहे.तसेच भाजपमधील एक गट कॉग्रेसबरोबर आल्याने त्याच्यांकडून सक्षम पॅनेल उभे राहिल. दुसरीकडे पुर्वाश्रमी कॉग्रेसचे मात्र

सांगली बाजार समिती सभापती निवडीपासून कॉग्रेसपासून फारत घेतलेले माजी सभापती मन्सूर खतीब,यांच्यासह प्रा. बि.आर. पाटील, विलास माने,बाळासाहेब पाटील, माजी संरपच साहेबराव गायकवाड, संभाजी माळी,जेके माळी यांच्या कडून तुल्यबंळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले जाणार आहे. सध्या त्यांच्याकडे इनकंमीग जोरात असल्याने त्यांचे पारडे काहीसे जड आहे.त्यांच्याकडेही भाजपचा एक गट आला आहे.एंकदरीत डफळापूरच्या मिनी मंत्रालयाच्या सत्तेसांठी महायुध्द सुरू झाले आहे. त्यात अनेक अदृष़्य शक्ती आता प्रकट होत असल्याने रंगत वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.