थेट संरपच निवडीत सर्वसमावेशक उमेदवार कॉग्रेसची ताकत

0

थेट संरपच निवडीत सर्वसमावेशक उमेदवार कॉग्रेसची ताकत

डफळापूर, मिरवाड, जिरग्याळ, खलाटी ग्रामपंचायतीवर कॉग्रेसचे निशान फडकवू

डफळापूर, वार्ताहर: डफळापूर सह परिसरातील मिरवाड, जिरग्याळ, मिरवाड, शिंगणापूर ग्रामपंचायतीवर यावेळी कॉग्रेसचा झेंडा फडकणार आहे. शिवाय पाच वर्षातील भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या डफळापूरातील निवडणूकीत विकास याच मुद्यावर आम्ही मतदारापुढे जात आहेत. असे प्रतिपादन माझी भूमिका मांडतांना पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी स्पष्ट केली.

जत तालुक्यातील महत्वाच्या डफळापूर ग्रामपंचायतीत गेल्या पाच वर्षात सत्ताधारी सर्वच आड्यावर मागे पडले आहेत. विकासाचा डांगोरा पिटला मात्र प्रत्यक्षात पदाधिकाऱ्यां

Rate Card

चाच विकास झाला आहे. नागरिकाचे प्रश्न तसेच आहेत. अनेक विकास कामात क़मिशन खोरीने बोगस कामेही घुसडल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. त्यामुळे डफळापूरतील जनता यावेळी सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहे. आमच्या पँनेलचे जुने,नवे असा समतोल साधत तगडे उमेदवार उतरविणार आहोत. डफळापूरच्या नावलौकिका प्रंमाणे प्रत्यक्षात विकास साधायचा आहे. सुज्ञ नागरिक आमच्या पँनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करणार हे निश्चित आहे. अनभुवी ,तरूण व स्वच्छ चेहरे हे आमचे अस्ञ आहे.मिरवाड,जिरग्याळ, शिंगणापूर मध्ये आमचे स्थानिक नेत्यांनी तगडे पॅनेल लावण्याची तयारी पुर्ण केली आहे. खलाटीतील आमच्याच गटाचे काही स्थानिक नेत्यांनी तिसरे पॅनेल उभे करण्याचे प्रयत्न चालविलेत. मात्र दोघी गटाचे मनोमिलन करून एकच तगडे पॅनेल लावणार आहोत. 

चौकट: 

थेट संरपच निवडीत यावेळी अनुभवी,स्वच्छ, विकास साधणारा सर्वसमावेशक चेहरे आमचे अस्ञ सर्व ग्रामपंचायत पँनेलमध्ये असेल.त्यामुळे या निवडणूकीनंतर नव्या विकासपर्वाला सुरूवात होईल असा विश्वास दिग्विजय चव्हाण यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.