नगरपालिकेवर कॉग्रेसचा झेंडा फडकवू : विक्रम सांवत

0

नगरपालिकेवर कॉग्रेसचा झेंडा फडकवू : विक्रम सांवत 

नगराध्यक्ष गंवडीसह 6 नगरसेवकांचा कॉग्रेस प्रवेश


जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका पालिका निवडणूकीत एकसंघ कॉग्रेसची सत्ता आणू अशी माहिती कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी पत्रकार बैठकीत दिली. जत नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी कॉग्रेस प्रवेश केला. त्या कार्यक्रमात सांवत बोलत होते.
निवडणूकीच्या पाश्वभमीवर वंसतदादा आघाडीचे नगराध्यक्ष इकबाल गंवडी, रविंद्र साळे,महादेव कोळी,माया शंकर सांळे, संगिता भैरू माळी, शुंभागी अशोक बन्नेनावर व राष्ट्रवादीचे विद्यमान उपनगराध्यक्ष श्रींकात शिंदे यांनी कॉग्रेस प्रवेश केला. कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉग्रेसच्या झेंड्याखाली काम करण्याची घोषणा केली. माजी मंत्री आ. पंतगराव कदम यांच्या उपस्थितीत मेळाव्यात त्यांचा जाहीर प्रवेश सोहळा होणार आहे.
सांवत पुढे म्हणाले,नगरपालिकेच्या पहिल्या वाहिल्या निवडणूकीत जतच्या जनतेनी आम्हाला चांगले यश दिले,मात्र सत्तेपासून पहिल्या अडीच वर्षात बाहेर रहावे लागले,पुन्हा सत्तेत सामिल झालो. मात्र सतत सत्तेतील ओढाओढी,गटतट,स्वकियांची अडवणूक यामुळे निवडणूकीत दिलेली आश्वासने पुर्ण करता आली नाहीत. पंरतू यावेळी कॉग्रेसची ताकद वाढली आहे. यावेळी नगरपालिकेत कॉग्रेसची सत्ता येईल.

Rate Card


नगराध्यक्ष इकबाल गंवडी म्हणाले, आम्ही मुळचे कॉग्रेसचे आहोत.त्यामुळे कॉग्रेसमध्ये आलो आहोत. गत पाच वर्षात नगरपालिकेत विकास साधण्याचा स्वच्छ प्रयत्न केला आहे. भाजपच्या काही समर्थक ठेकेदारानी सतत अडवणूक, प्रशासनावर दमदाडी करून विकास कामे अडवून ठेवले आहेत. त्यामुळे सुमारे 4 कोटीवर कामे रखडली आहेत. चांगल्या कामाचा गौरव करत जत नगरपालिकेला स्वच्छता अभियांनाचा एक कोटीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा पहिला तिस लाख रुपायाचा हप्ता मिळाला आहे. तो स्वच्छतेसाठी खर्च करणार आहोत. त्यातून कामेही सुरू झाली आहेत. कॉग्रेसला मजबूत करून कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर कॉग्रेसचा झेंडा फडकवू 
जत नगरपालिकेत सध्या कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या गटाची सत्ता आहे.त्याच धर्तीवर यावेळीही कॉग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार उपस्थितीना सर्व नगरसेवक, व पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी नगरसेवक नाना शिंदे, मुन्ना पखाली,परशूराम मोरे,बाळ निकम,आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.