गोरक्षणाच्या नावाने हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे
नवी दिल्ली – आज सर्वोच्च न्यायालयात कथित गोरक्षकांच्या हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने गोरक्षणाच्या नावाने हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे म्हटले आहे. यावेळी पहलू खान यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी झाली. पीडितांना अशा घटनांमध्ये भरपाई देण्याची सर्व राज्यांची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
गुजरात, राजस्थान, झारखंड, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार अनुपालन अहवाल दाखल केले आहे. तर न्यायालयाने इतर राज्यांनीही अहवाल दाखल करावा, असे आदेश दिले आहेत. ३१ ऑक्टोबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
