पुन्हा एक धक्का देण्याच्या तयारीत मोदी-शहा जोडी
२०१८ मध्येच घेणार लोकसभा निवडणुका ?
नवी दिल्ली: पुन्हा एक धक्का देण्याच्या तयारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची जोडी असून मुदतीपूर्वीच आगामी लोकसभा निवडणुका घेण्याचा विचार मोदी-शहा जोडीचा आहे.
एप्रिल ते जून २०१९ यादरम्यान नियमानुसार आगामी लोकसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. पण त्यापूर्वीच म्हणजे २०१८च्या शेवटी मोदी-शहा लोकसभा निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यासाठी हा निर्णय घेण्याची तयारी असल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे.

भाजपशासित राज्यांच्या १३ मुख्यमंत्र्यांची आणि सहा उपमुख्यमंत्र्यांची गेल्या महिन्यात मोदी-शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यासाठीच ही बैठक होती की काय, अशी आता चर्चा सुरु झाली आहे. देशातील परिस्थिती २०१९ पर्यंत काय असेल, कोणत्या अडचणी सरकारसमोर उभ्या राहतील, याचा अंदाज बांधला जाऊ शकत नाही. त्यापेक्षा २०१८ पर्यंत सरकारबद्दल सकारात्मकता कायम राहून, कमी संकटे असतील. शिवाय १०-१२ महिने सत्तेचा मोह सोडल्यास आणि ५ वर्ष सत्ता मिळू शकते, असे गणित भाजपचे असल्याचे सांगण्यात येत आहे.