जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जत तालुक्यात जत तहसील कार्यालय,संख अप्पर तहसील,जत उपविभागीय अधिकारी,पंचायत समिती,जत नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन,महावितरणची जत,संख येथे,जलसंधारणचे उपविभागीय,तालुका,वनविभाग,सामाजिक वणीकरण,भूमिअभिलेख,उपनिबंधक खरेदी विक्री,उपनिंबधक सहकारी संस्था,उपविभागीय कृषी,तालुका कृषी,जलसंपदाची अनेक कार्यालये,पांटबंधारे,जत,उमदी पोलीस ठाणे,जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,यासह प्रत्येक गावात तलाठी,ग्रामपंचायत,महसूल,कृषीचे मंडल विभाग अशी मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालयातून तालुक्याचा कारभार चालतो.
मात्र यातील बोटावर मोजण्याएवढ्या कार्यालयातील कारभार काही प्रमाणात बरा चालतोय,अन्यथा इतर सर्व कार्यालये लाच,भष्ट्राचाराने वाकली असून येथे येणारे नागरिक त्यांच्या कारभाराने पिचले आहेत.मुर्दाड अधिकारी,कर्मचाऱ्यांकडून त्यांना नागविण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत.येथे येणारा प्रत्येक अधिकारी,कर्मचारी वळणावर जात असून यात तालुक्यात रात्र् न् दिवस काबाडकष्ट करून मिळविलेला पैसे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या झोळ्या भरण्यासाठी ओतत आहे.तरीही त्यांची कामे होतीलच याची शाश्वती नसल्याचे चित्र आहे.