पढंरपूर घटनेची सखोल चौकशी करून कडक कारवाई करा

0
जत : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली परिसरात राहणाऱ्या धनगर समाजातील अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीचे अपहरण करुन सतत अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे ही घटना अतिशय निंदनिय आहे. या घटनेचा जत तालुका धनगर समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करीत आहोत.

 

Rate Card
युवक नेते विक्रम ढोणे म्हणाले,या घटनेतील आरोपी व सदर आरोपीला मदत करणाऱ्या इतरांना सह आरोपी करुन, तात्काळ अटक करण्यात यावी व जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून तातडीने तपास पूर्ण करून आरोपींना कठोर शासन करण्यात यावे, जेणे करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

 

यावेळी पोलीस निरीक्षक निवेदन देताना जिप सदस्य सरदार पाटील, शिवसेनेचे नेते अमित बंटी दुधाळ, शहाजी वाघमोडे, तुकाराम खांडेकर बाळासाहेब खांडेकर,विजय खांडेकर,शिवाजी चोरमुले अजय कोळेकर,भाऊसाहेब लोखंडे, नामदेव पुजारी, संतोष मोटे, रफिक शेख,शिवाजी पडळकर,कृष्णा वाघमोडे आदि उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.