शेगाव दरोडा प्रकरणातील सव्वा दोन कोटीचे, साडेचार किलो सोने फिर्यादीस सुपुर्द

0
3
जत : जत तालुक्यातील जत-शेगाव मार्गावरील दरोड्यात चोरीस गेलेले २ कोटी २६ लाख १३ हजार ५०० रूपयाचे ४ किलो ५३० ग्रँम सोने फिर्यादी बाळासाहेब वसंत सांवत (रा.पळसवेल ता.आटपाडी) यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सुपुर्द करण्यात आले.

 

 

यावेळी सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर,अरूण लाड,पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम,अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबूले,डिवायएसपी रत्नाकर नवले,पो.नि.रत्नाकर गायकवाड,उदय डुबूल उपस्थित होते.

 

 

 

ता.१५ जानेवारी २०२१ ला बाळासाहेब  सावंत हे शेगाव (ता.जत) येथील पार्टीस सोने देण्यासाठी त्यांच्या फोर व्हीलर गाडीने जात असताना मध्यरात्री १.०० वाजनेच्या सुमारास जत ते सांगोला जाणारे रोडवर जतपासून २ किलामीटर पुढे गेल्यावर फिर्यादी सांवत यांनी लघवी करणेसाठी गाडी थांबविली असता, पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाचे चार चाकी ओमणी कार मधून काही अज्ञात दरोडेखोरांनी बाळासाहेब सावंत यांच्या डोळ्यात चटणी टाकून गाडीतील लॉकर मध्ये ठेवलेले ४ किलो ५३० ग्रॅम वजनाचे सोने व दोन मोबाईल असा एकूण २,२६,१३,५०० रुपयाचा माल दरोडा टाकून चोरुन नेला होता.

 

 

 

याबाबतचा जत पोलीस ठाणे येथे भाग ५ गुरंन २१/२०२१ भादविस कलम १२० ब,३९५,३९७,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी त्याचे कडील पथकाने २४ तासात गुन्ह्याचा उगडा करुन गुन्ह्यातील पाच आरोपीना अटक करत त्यांच्याकडून २,२६,१३,५०० रुपयाचे ४ किलो ५३० ग्रॅम वजनाचे सोने व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला होता.

 

 

 

फिर्यादी बाळासाहेब सावंत यांना पोलीस अधिक्षक कार्यालय येथे त्यांचे चोरीस गेलेले ४ किला ५३० ग्रॅम वजनाचे सोने परत देण्यात आले.दरम्यान फिर्यादी बाळासाहेब सावंत यांनी पोलीसाचे आभार मानले.

 

 

 

 

शेगाव दरोड्यातील साडेचार तोळे सोने फिर्यादी बाळासाहेब सांवत यांना परत देताना पालकमंत्री जयंत पाटील, ना.विश्वजीत कदम,आ.अनिल बाबर,अरूण लाड,पोलिस अधिक्षक दिक्षित गेडाम व अधिकारी
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here