सांगली जिल्हा बँक निवडणूक | महाविकास आघाडीला,..या उमेदवारांने दिला पांठिबा

0
जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या निवडणूकीतील इतर मागास प्रवर्ग ब-३ मधील महाविकास आघाडीला यांना अपक्ष उमेदवार मुजीर आब्बास जांभळीकर यांनी पांठिबा दिला आहे. तसे पत्र त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

 

 

 

जांभळीकर यांनी पत्रात म्हटले आहे की,मी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत इतर मागास प्रवर्ग ब-३ मधून उमेदवारी अर्ज भरला होता.काही अपरिहार्य कारणामुळे माझा अर्ज वेळेवर माघारी घेऊ शकलो नाही.मात्र मी या निवडणूकीत कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस,शिवसेना महाविकास आघाडी प्रणित सहकार विकास पँनेलला जाहीर पांठिबा दिला आहे.यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदा झाला आहे.

 

 

सांगली बाजार समितीचे माजी संचालक असलेले जांभळीकर यांच्यामुळे महाविकास आघाडीचे मागास प्रवर्ग ब-३ चे उमेदवार मन्सूर खतीब यांना फायदा होणार आहे.

 

 

 

Rate Card
दरम्यान जांबळीकर म्हणाले,माझ्या समर्थक मतदारांनी आपले मत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कपबशी चिन्हावर मतदान करून त्यांना विजयी करावे.सध्या महाविकास आघाडीच्या पँनेलला मोठा पांठिबा मिळत असल्याने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे जांभळीकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.