जत नगरपरिषद ‘प्रभाग ५ ब’ ची पोटनिवडणूक यावेळी होणार ..

0
जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेच्या प्रभाग ५ ब च्या पोटनिवडणूक लवकरचं होणार असून त्यासाठीच्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहिर करण्यात आला आहे.

 

 

राज्यातील नगर परिषदा/नगरपंचायतींमधील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम-२०२१ जाहीर झाला असून जत नगर परिषदेचा यात समावेश असून प्रभाग पाच या पोटनिवडणुक साठी राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ,

 

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड, सांगली जिल्ह्यातील जत, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड व फुलंब्री, नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील ९ रिक्त सदस्यांची पदे रिक्त झाल्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकारी/मुख्याधिकारी यांच्याकडून राज्य निवडणूक आयोगास प्राप्त झालेल्या आहेत.

 

 

त्यावरून मतदार प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम खालीलप्रमाणे राहील प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे दि.१८/११/२०२१, प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागविणे : दि.१८/११/२०२१ :दि.२२/११/ २०२१ पर्यंत प्रभागनिहाय मतदार

 

 

 

यादी प्रसिध्द करणे : दि. २३/११/२०२१ मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करणे : दि.२५/११/२०२१ प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करुन अंतिमरित्या प्रसिध्द करणे : दि.२६/११/२०२१ असे राहणार आहे. कोल्हापूर, चंद्रपूर, सांगली, औरंगाबाद, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यांचा पोटनिवडणुकीचा समावेश आहे.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.