जत,संकेत टाइम्स : वळसंग ता.जत येथील प्रदिप हणमंत टिळे यांचे मेडिकल दुकान फोडून लँपटॉप चोरून नेहल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी,प्रदिप टिळे यांचे वळसंग येथे मेडिकल दुकान आहे.बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले होते.मध्यरात्री दुकानचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत आतील १५ हजार रूपये किंमतीचा लँपटॉप चोरून नेहला आहे.
जाडरबोबलादमध्ये किरकोळ कारणावरून एक्स मारहाण
माडग्याळ : जाड्डरबोबलाद ता.जत येथील सुरेश सिध्दण्णा जमखंडी यांचा मुलगा अमोगसिध्द याला भावकीतील रावताप्पा शिवगोंडा जमखंडी व अनिल रावताप्पा जमखंडी या दोघांनी काठी,हाताने मारहाण केल्याचा गुन्हा उमदी पोलीसात दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी,फिर्यादी सुरेश जमखंडी व संशयिताची जमिन लगत आहे.मधिल रस्त्याने फिर्यादीचा मुलगा अमोगसिध्द जात असताना या रस्त्याने जायाचे नाहीस म्हणून संशयित दोघांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रेवनाळमध्ये घर फोडून ७४ हजाराचा मुद्देमाल लंपास
जत : रेवनाळ ता.जत येथील बाळासो भानुदास चौगुले यांचे घरी बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत ७४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.
अधिक माहिती अशी,बाळासो चौगले हे रेवनाळ येथे राहतात.बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाज्याचे कडी कोंयडा तोडून घरात प्रवेश करत लोंखडी कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील ६० हजाराचे सोन्याचे दागिणे,रोख १४ हजार पळवून नेहले आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.
उटगीत भरदिवसा घरफोडी,दीड लाखाचा मुद्देमाल लंपास
उटगी :
उटगी येथील उटगी ते लवंगी कारखाना रस्त्यावरील इराप्पा चनबसप्पा बासरगाव यांच्या घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दिवसाढवळ्या चोरी करून चार तोळे सोने,चांदी आणि 80 हजाराची रोकड असे दीड लाखाची चोरी करत धूम ठोकली .याबाबतचे अधिक माहिती अशी की, दुपारी बाराच्या सुमारास उटगी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उटगी ते लवंगी रस्त्याच्या लगतच असणाऱ्या इराप्पा बासरगाव यांच्या घराचे कुलूप फोडून चार तोळे सोने ,चांदी आणि ऐंशी हजाराची रोकड असा किंमती माल चोरी करून अज्ञात इसमानी धूम ठोकली यामुळे खळबळ माजली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे .बासरगाव कुटुंबीय शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दिवसाढवळ्या घर फोडून चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे