महिलाची पायपीठ थांबावी,या संस्थेने केले ई-बाईकचे वाटप

0
जाळीहाळ खुर्द,संकेत टाइम्स : येरळा प्रोजेक्ट सोसायटी महिलांच्या मदतीला आली असून जालीहाळ खुर्द परिसरातील विविध मार्गावर जाण्यासाठी महिलांना लागणारी पायपीठ बंद होणार आहे. यासाठी या मार्गावरून जाताना महिलांना ई बाईकसाठी फक्त एक फोन करायचा त्यांना तात्काळ ई-बाईक ची सेवा उपलब्ध होणार आहे,अशी माहिती येरळा चे सचिव नारायण देशपांडे यांनी दिली.

 

 

 

 

येरळा प्रोजेक्ट सोसायटी गेल्या तेवीस वर्षापासून जत तालुक्यातील जालिहाळ बु येथे कार्यरत आहे.जत तालुक्यातील जालिहाळ बु हे गाव कर्नाटकच्या सीमेवर असलेल येक छोटंसं गाव जत तालुक्याचा विस्तार हा खुप मोठा आहे व गाव विरळ लोकसंख्या आहे.त्यामुळे दळणवळणाची सोयी मात्र खुपचं कमी आहे.त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.

 

 

 

विशेषता महिलांचे खुप हाल होतात.त्यामुळे येरळा प्रोजेक्ट सोसायटी यांनी प्रत्येक गावातील महिला गट प्रमुखां सोबत चर्चा करून असे अडचणीचे 18 मार्ग शोधण्यात आले आहेत.जेणेकरून महिलांना पायपीट करावी लागणार नाही.त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा,यासाठी येरळा प्रोजेक्ट सोसायटी यांच्या वतीने E-BIKE ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

 

 

ज्या महीलांना थांब्यावरुन चालत जावे लागते.अशा मार्गावरील थांब्याच्या ठिकाणी स्थानिक E-BIKE चा मोबाईल क्रमांक लावला गेला आहे.त्या मोबाईल क्रमांकावर फोन लावून E-BIKE ची सेवा महिला घेवू शकतात.

 

 

नामवंत सिने निर्माते गजेंद्र अहिरे , उद्योगपती कल्याण तावरे, येरळा चे सचिव नारायण देशपांडे यांच्या बहिणी  सौ.रंजना बाजी, डॉ.सौ.कल्पना देशपांडे यांच्या उपस्थितीत जालिहाळ बुद्रुक येथे “E bike सखी” कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याद्वारे पाच E Bikes येरळाच्या महिला कार्यकर्त्यांना वितरित करण्यात आल्या.

 

 

Rate Card
गजेंद्र अहिरे व कल्याण तावरे यांनी येरळाने जालिहाळ बुद्रुक भागात हाती घेतलेल्या प्रकल्पांना भेटी दिल्या. या भागातील महिलांच्या परिस्थितीवर आधारित प्रबोधनात्मक चित्रपट बनवण्याचे मनोगत व्यक्त केले.
येरळा प्रोजेक्ट सोसायटी यांच्या वतीने पाच ई-बाइक वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.