आवंढी सर्व सेवा सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा

0
आंवढी : आवंढी (ता.जत) येथील सर्व सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक झाली या निवडणूकीकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस ने एकहाती सत्ता मिळवली. 25 वर्षानंतर आवंढी सोसायटीत संत्तातर झाले आहे. इतिहासात प्रथमच सोसायटीसाठी अटीटतीची लढत झाली.

 

 

 

सरपंच, उपसरपंच, सदस्य व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा डॉ. कोडग मॅडम, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ,राष्ट्रवादी चे स्थानिक नेते व कार्यकर्ते यांचा एक गट तर दुसऱ्या बाजूला चाळीस वर्षे एकमेकांचे विरोधक  असणारे काँग्रेस, भाजप  व शिवसेना असे तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एका बाजूला अशी जोरदार लढत रंगली. राजकीयदृष्टया अत्यंत प्रतिष्टेची व अटीतटीची असणाऱ्या सोसायटी निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.
संपूर्ण निवडणुकीत प्रथमच सत्ताधारी व विरोधक यांनी एकमेकावर आरोपपत्यारोप केले.गेल्या दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी मध्ये गेलेले सरपंच, उपसरपंच,माजी पोलीस पाटील, राष्ट्रवादी चे स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्या गटाला एकहाती सत्ता देत 13 उमेदवारांना विजयी केले.सत्ताधारी गटाला तीन पक्ष एकत्र येऊनही त्यांनी यश मिळवता आले नाही.

 

 

सरपंच आण्णासाहेब कोडग यांनी मागील चार वर्षात आवंढी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे केली.पाणी फाउंडेशन, दारूबंदी, आवंढी ते सोळगेवाडी डांबरी रस्ता, आवंढी ते माणिक नगर डांबरी रस्ता, हायमास्ट, गावअंतर्गत रस्ते, गटारी,पाणी पुरवठा विहीर खोलीकारण, पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या अशी अनेक विकास कामे केली आहेत.

 

 

यापुढेही अजून भरपूर कामे करणार आहोत व सोसायटी च्या माध्यमातून गावातील सर्व शेतकऱ्यांना सभासद करून  कर्ज वाटप करू असे आश्वासन दिले होते. ते मी पूर्ण करणार आहे असे सोसायटी विजयानंतर संरपच आण्णासाहेब कोडग यांनी सांगितले.

 

Rate Card
या निवडणुकीत सर्व साधारण गटातून  दिगंबर कोडग, धोंडीराम कोडग, मारुती कोडग, लक्ष्मण तात्या कोडग, विठ्ठल कोडग  (मधला मळा ), शामराव कोडग, शिवाजी देशमुख, आण्णासाहेब बाबर, महिला गटातून ज्योती चव्हाण, सुमन सोळगे, इतर मागासवर्गीय गटातून नारायण कुंभार, भटक्या व विमुक्त गटातून संजय एडगे, अनुसूचित जाती जमाती गटातून  रावसो गेजगे हे उमेदवार विजयी झाले आहेत.

 

 

विजयी उमेदवारांचे राष्ट्रवादी नेते सुरेश शिंदे, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष उत्तम शेठ चव्हाण, राष्ट्रवादी च्या महिला तालुकाध्यक्ष डॉ. गीता कोडग, सरपंच आण्णासाहेब कोडग , उद्योगपती शशिकांत उर्फ बबलू शेठ कोडग, डॉ.कोडग यांनी सर्व जनतेचे आभार मानले. व यावेळी बबन (दादा) कोडग, श्रीरंग भाऊ, एस. आर. कोडग, आण्णासाहेब कोडग (मेजर), महादेव (नाना) कोडग,जांबुवंत कोडग, दगडु (दादा) कोडग,विलास दादा, रामहरी कोडग, दत्ता मामा,वसंत (बापू) कोडग , दत्ता मामा बाबर, डॉ. विश्वास बाबर,भारत कोडग, सुभाष कोडग,

 

 

तात्यासाहेब कोडग, विनोद कोडग, बापू काका, वामन कोडग,आबासाहेब बाबर,भास्कर कोडग, गोपीनाथ कोडग, मारूती सरपंच, आबासाहेब सरपंच, हरिदास दामू कोडग, पतंग आप्पा, भगवान मेजर,महादेव मेजर, समाधान दादा, प्रकाश सोळगे, अक्षय कोडग, बापू कोडग,संभुदेव पाटील, सतिश पाटील, सुधाकर कोडग,पांडू कोडग ,आप्पासाहेब चव्हाण, विनायक कोडग,पप्पू तोरणे, भिकाजी तोरणे,

 

 

स्वप्नील कोडग,अर्जुन गेजगे,संजय काशिद, धनाजी सोळगे, राजू कोडग(मुंबई), राहुल कोडग,अंतोष सोळगे, आनंद बोरगे, राजाराम बोरगे,मारुती माने, रावसो माने, दत्ता महादेव कोडग,अंकुश माने व सर्व मित्र परिवार  गावातील राष्ट्रवादी प्रेमी कार्यकर्त्यांनी सोसायटी च्या निकालानंतर एकच जल्लोष साजरा केला.
आंवढीत सोसायटीच्या विजयानंतर विजयोत्सव साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.