21 जानेवारीला माडग्याळमध्ये भव्य सर्वरोग महाआरोग्य तपासणी शिबीर | डॉ.सार्थक हिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

0
माडग्याळ,संकेत टाइम्स : माडग्याळ ता.जत येथील डॉ.सार्थक हिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त 21 जानेवारी रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत हिट्टी मल्लिटीस्पेलटी हॉस्पिटल  माडग्याळ या ठिकाणी मोफत भव्य सर्वरोग महाआरोग्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉ.सार्थक  हिट्टी यांनी दिली.

 

या शिबिरा मध्ये तज्ञ डॉ.सार्थक हिट्टी स्त्रीरोग तज्ञ (MBBS, DGO) ,डॉ.विवेक पाटील मेडीसिन ह्रदयरोग तज्ञ(MBBS , MD), डॉ. शेखर हिट्टी जनरल फिजिशियन (BAMS), डॉ.ऐश्वर्या पाटील स्त्रीरोग तज्ञ ( MBBS.MS.) डॉ.शिवमाला हिट्टी जनरल फिजिशियन (BAMS ) यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये हे मोफत भव्य सर्वरोग महाआरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.

 

या शिबिरा मध्ये मोफत x- ray,मोफत ECG , मोफत सोनोग्राफी , मोफत औषध वाटप, मोफत रक्त तपासणी  (ब्लड शुगर ) ,मोफत तज्ञ  डॉक्टरांकडून तपासणी, मोफत बाळंतपण पेशंटची खास तपासणी , मोफत अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी  या शिबिरातील विभाग स्त्रीरोग ,जनरल मेडीसिन , बालरोग , ह्रदयरोग , अस्थिरोग, जनरल सर्जरी, यासारखे आजारावर मोफत तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ .सार्थक हिट्टी यांनी केले .
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.