सेवा सोसायट्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी समृद्ध होईल ; निवृत्ती शिंदे

0
2
उमदी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थ करणाची केंद्र असलेल्या सोसायटी भविष्यात हारितक्रांती आणतील.उमदीतील सभासदांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लावू,असा विश्वास निवृत्ती शिंदे यांनी व्यक्त केला.उमदी ग्रामपंचायत सभागृह येथे उमदी व बेळोंडगी विविध विकास सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत निवडून आलेल्या नुतन संचालकाचा व पॅनेल प्रमुखांचा सत्कार बेळोंडगी व उमदी गावच्या वतीने करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित बेळोंडगी पंचायत समिती सदस्य दर्याप्पा हत्तळी,माजी पंचायत समिती सदस्य कल्लाप्पा हलकुडे,उमदी गावचे सरपंच वर्षा निवृती शिंदे, उपसरपंच कलावती तोरणे,उमदी गावचे नेते निवृत्ती शिंदे सरकार,ग्रामपंचायत सदस्य नारायण भाऊ ऐवळे,वहाब मुल्ला,दावल भाई शेख, राहुल श्रीमकळ्ळ,ग्रामपंचायत सदस्य मनोहर शिंदे,युवा नेते सचिन होर्तीकर,

 

सुरेश हत्तळी,बंडु शेवाळे, अनिल शिंदे सरकार,तानाजी मोरे,आप्पु कोरे,शरद भुसे,माजी उपसरपंच रमेश आण्णा हळके,संतोष अरकेरी,विष्णु नागणे, डॉ महावीर अजमाने, अरविंद मुंगळे,बेळोंडगी व उमदी गावचे आजी,माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य..व आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here