जतेतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा

0
जत, संकेत टाइम्स : विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने सर्व प्रशासकिय बाबींची पूर्तता केल्याने जत येथिल नियोजीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

 

या बैठकीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अशोकराव कांबळे, उपाध्यक्ष संजयरावजी कांबळे, सचिव, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, खजिनदार, अतुल कांबळे, पापा सनदी, संजय कांबळे (पाटील) व नितीन सनदी,वैभव.कांबळे, पप्पू कांबळे  आदी मान्यवर उपस्थित होते.

 

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उपाध्यक्ष संजय द.कांबळे म्हणाले की, जत येथिल मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सर्वेनंबर ७२३ या जागेवर विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी नुकतेच जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली आहे. नियोजित ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरच बसविण्यात येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा हा औरंगाबाद येथे तयार करण्यात आला असून लवकरच आम्ही हा पुतळा जतला आणणार आहोत.
ते पुढे म्हणाले की, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष ना. रामदासजी आठवले साहेब, वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर, प्रा.जोगेंद्र कवाडे, जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील,सहकार व कृषी राज्य मंत्री ना.विश्वजित कदम,आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनंतर  बसविण्यात येणार आहे असेही कांबळे म्हणाले.

 

दलित पॅथरचे नेते नगरसेवक भूपेंद्र कांबळे म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे दि.५ मार्च १९३४ रोजी जत येथे आले होते. त्यावेळी त्यानी जत येथे मोठी अस्पृष्यता निवारण परिषद घेतली होती. तेंव्हापासून विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जत येथील समाजबांधवांना आठवण रहावी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जतमध्ये बसविला जावा अशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांची इच्छा होती. ती या निमित्ताने पूर्णत्वास जात आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे चबुत-यासाठी आमदार श्री. विक्रमसिंह सावंत यानी मोठी मदत केल्याचेही नगरसेवक भूपेंद्र कांबळे यानी सांगितले.

 

माजी सरपंच बसपाचे नेते,अतुल कांबळे म्हणाले की, जत येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार असून हा पुतळा ज्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे त्या परिसरामध्ये भव्य असा बगिचा तयार करण्यात येणार आहे, तसेच पुतळा परिसरा भोवती आकर्षक विद्धूत रोषनाई व हॅलोमॅक्स दिवे बसविण्यात येणार आहेत.सद्या स्मारकाच्या भोवताली दगडी भिंत बांधून त्यावर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.

 

स्मारक समितीचे अध्यक्ष अशोकराव कांबळे म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. आमदार श्री. विक्रमसिंह सावंत यानी चबुत-यासाठी मदत केली आहे. चबुत-यावर फरशी बसवून सुशोभिकरण करण्याचे काम सुरू आहे. जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरच बसविण्यात येणार असल्याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायामध्ये उत्साह दिसून येत आहे असेही कांबळे म्हणाले .
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.