जत तालुक्यात खळखळणारे पाणी म्हैसाळ योजनेच्या यशस्वीतेचे फलित 

0
जत,संकेत टाइम्स : म्हैशाळ योजना ही जत तालुक्याला वरदान ठरलेली सर्वात मोठी योजना आहे. याचा तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवाना नक्कीच लाभ होतोय व भविष्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल. या योजनेमुळे जत मधील बरीच वर्ष ओसाड व उजाड राहिलेली शेतजमीन ओलिताखाली आल्यामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर उमललेले हासू या योजनेच्या यशस्वीतेचे फलित असल्याचं नक्कीच अधोरेखित होतेय,असे उद्गार आमदार विक्रमसिंह सांवत यांनी काढले.

 

या योजने संदर्भात रविवारी आ.सांवत यांनी जत तालुक्यातील वळसंग, कोळगिरी, लकडेवाडी, सोन्याळ, उटगी येथील पाईपलाईन व तलावांची पाहणी केली तसेच येथील शेतकरी बांधवांशी व म्हैशाळ योजनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी समवेत माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब कोडग,

 

माजी मार्केट कमिटी सभापती संतोष पाटील, म्हैशाळ पंप 2 चे कार्यकारी अभियंता सचिन पवार, डेप्युटी इंजिनिअर गणेश खरमाटे, डेप्युटी इंजिनिअर बाबासाहेब पाटील, सहाय्यक कार्यकारी अभियंता जाधव साहेब व सरपंच उपसरपंच सदस्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.