गुडन्यूज : राज्यातील बैलगाडी शर्यत आयोजकांवरील गुन्हे मागे घेणार,मंत्रिमंडळाचा निर्णय

0
मुंबई : महाराष्ट्रात बंदी असतानाही बैलगाडी शर्यत आयोजन करण्याऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.

 

 

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर
राज्यात अनेक ठिकाणी बंदी काळात बैलगाडी शर्यतीसंबंधी आयोजकांवर दाखल करण्यात आलेले विविध गुन्हे मागे घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. मंत्रिमंडळाने आज बेलगाडीप्रेमींना याबाबत दिलासा दिला आहे. बैलगाडी शर्यत आयोजन केल्य़ामुळे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
महाविकासआघाडी सरकार याबाबत सकारात्मक होती. पण आता बैलगाडा शर्यतीशी संबंधित गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदीच्या उठावी म्हणून विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती. अनेकांनी बंदीला झुगारुन बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं होतं. ज्यामुळे कायद्याच्या उल्लंघनामुळे अनेक लोकांवर गुन्हे दाखल आले होते. सुप्रीम कोर्टाने देखील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे आता बैलगाडी शर्यती सुरु झाल्या आहेत.

 

 

बैलगाडी चालकांना मोठा दिलासा 

 

राज्यभरात बंदी असताना बैलगाडी शर्यती घेतल्यामुळे अनेक बैलगाडी चालक व आयोजकावर गुन्हे दाखल झाले होते.त्यामुळे नाराजी होती.हे गुन्हे मागे घ्यावेत,अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती.अखेर सरकारने मोठा निर्णय घेत असे दाखल गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे बैलगाडी चालकात समाधान व्यक्त होत आहे.

 

 

भारत गायकवाड

बैलगाडी चालक/मालक संघटनेचे नेते

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.