ऑफिसर नंबर वन चित्रपटात जतच्या कलाकारांना संधी 

0

जत,संकेत टाइम्स : जत शहरासह जत तालुक्यातील कलाकारांना हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असून या भागातील कलाकार असलेला सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार असल्याची माहिती, महाराष्ट्र कलाकार सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य दिनकर पतंगे यांनी दिली.

 

पंतगे म्हणाले की,सध्या जत तालुक्यात आणि जत शहरात बरेच छोटे-मोठे कलाकार तयार होत आहेत.प्रत्येक जण आपापल्या परीने मिळेल त्या चित्रपटात मिळेल त्यात टीव्ही सिरीयल मध्ये शॉर्ट फिल्म मध्ये काम करत आहेत. सध्याचे महाराष्ट्र कलाकार सेना जत तालुका प्रमुख सरताज नदाफ यांना ऑफिसर नंबर वन या हिंदी चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे.तसेच लायन्स क्लबचे कॅबिनेट ऑफिसर राजेंद्र आरळी यांना देखील या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

 

या हिंदी चित्रपटाचे निर्माता डायरेक्टर यासीन जिगर रा. विजापूर यांनी या दोन कलाकारांना हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे.पुढेही आणखी चार-पाच कलाकारांना या हिंदी चित्रपटांमध्ये काम देऊ असेही जिगर यांनी सांगितले आहे.

 

Rate Card
ऑफिसर नंबर वन या चित्रपटाचे बाह्य चित्रीकरण जत शहर आणि त्या तालुक्यातील ग्रामीण भागात केले जाणार आहे.महाराष्ट्र कलाकार सेनेच्या माध्यमातून तालुक्यातील कलाकारांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या कलेला वाव दिला जाईल.

 

त्यांच्या अंगी असलेली कला सतत जागृत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे,पुणे,मुंबई, सांगली,कोल्हापूर मराठी चित्रपट नगरी येथील अनेक निर्माता,डायरेक्टर यांच्या आम्ही संपर्कात आहोत.येत्या काही दिवसाय या चित्रपटात लागणाऱ्या कलाकारांची ऑडिशन घेतली जाणार असल्याचेही असेही पंतगे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.