खलाटीतील दोघांनी केले गावाचे नाव उज्वल | एकजण पोलीस उपनिरिक्षक,दुसरा बनला वकील

0
Post Views : 372 views
डफळापूर,संकेत टाइम्स : खलाटी ता.जत येथील संतोष शहाजी कोळी यांची पोलीस उपनिरीक्षक (पि एस आय) पदी व त्यांचे बंधु अँड संदिप हणमंत कोळी यांनी वकील क्षेत्रात पदार्पण केल्याबद्दल खलाटी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला होता.यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत,नगरसेवक विजय ताड,साहेबराव कोळी,महादेव कोळी, निलेश बामणे, खलाटी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम देवकते, मुकेश बनसोडे, शहाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थाच्या आमदार विक्रमसिंह  सावंत यांच्याहस्ते नुतन पोलीस निरीक्षक संतोष शहाजी कोळी व वकील संदिप हणमंत कोळी यांचा व त्याचे आई- वडीलांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी पोलीस पाटील भाऊसाहेब शेजुळ यांनी प्रास्ताविक केले.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.