मी भाजपात समाधानी,जतच्या या नेत्याने दिला पक्ष बदलला पुर्णविराम

0
Post Views : 767 views
जत, संकेत टाइम्स : मी आमदार असताना जत पूर्व भागातील ४८ गावे व अंशतः १७ गावासाठी विस्तारित म्हैसाळ योजना खा. संजयकाका पाटील यांच्यासमवेत मांडली.संख येथील कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या योजनेला तत्वतः मान्यताही दिली.पण मागील अडीच वर्षात या शासनाकडून काहीही प्रगती झाली नाही. सहा महिन्यापूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या योजनेला सहा टीएमसी पाणी मंजूर केल्याचे सांगितले.
त्यावेळी मी स्वतः त्यांचा विशेष सत्कारही केला. पण प्रत्यक्षात या सहा महिन्यात केवळ विस्तारित योजनेचा सर्व्हे पूर्ण केला आहे. अजून डिझाइन, तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, आर्थिक तरतूद बाकी आहे.फक्त मंत्री पाटील यांच्याकडून तालुकावासीयांना भूलथापा देण्याचे काम सुरू आहे या शब्दात मंत्री पाटील यांच्यावर माजी आमदार जगताप यांनी निशाणा साधला.
ते तालुक्यातील सिंदूर येथे नूतन ग्रामपंचायत इमारत, दोन नवीन अंगणवाडया व सभागृहाचा उदघाटनप्रसंगी माजी आमदार बोलत होते.हा उद्घाटन सोहळा खा. संजयकाका पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या उपस्थितीत

 

संपन्न झाला. यावेळी पंचायत समिती सदस्य रामण्णा
जिवण्णावर, शिवाप्पा तावशी, आप्पासो नामद, चिदानंद चौगले, बसगोंडा जमगोंड, नागणगौडा पाटील, गुरुबसू कायपूरे,राहुल डफळे, गंगाप्पा हरुगिरी, राजू हिप्परगी,रायाप्पा अंदानी, सिद्दु मालाबाद, संगय्या स्वामी आदी उपस्थित होते.
यावेळी खा. संजयकाका पाटील म्हणाले की, जत
म्हैसाळ योजनेला भरीव २१०० कोटींचा निधी आतापर्यत आणला असल्याचे सांगत उर्वरित योजना लवकरच मार्गी लावू. तर जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्टया भक्कम करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
जगताप म्हणाले, माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात गावनिहाय मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. म्हैसाळचे काम पूर्णत्वासगेले पण मागील अडीच वर्षात विकासकामे शून्य झाल्याची टीका आमदार विक्रमसिंह सावंत यांचे नाव न घेता जगताप यांनी केली.तालुक्यातील जनतेनी दोन्ही आमदारांच्या कार्यकाळातील कामांची तुलना करावी असे आवाहनही त्यांनी केले.
मी भाजपमध्येच राहणार 
 माजी आमदार जगताप मंत्री जयंत पाटील हे विलासराव जगताप राष्ट्रवादीत येणार म्हणून खोटे सांगत आहेत. मी कोठेही जाणार नाही, भाजपमध्ये मी समाधानी असल्याचे सांगत जगताप यांनी राष्ट्रवादी प्रवेशास पूर्णविराम दिला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.