किरकोळ भांडणाच्या कारणातून मारहाण करून दोघांना दरीत ढकलून खून करणाऱ्या तिघां संशयिताना पोलीसांनी अटक केली आहे.जावळी तालुक्यातील एकीव धबधब्याजवळ किरकोळ भांडणातून हा प्रकार घडला आहे.या घटनेचा उलघडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ७२ तासांत केला आहे.पोलीसांनी पकडलेले तिघेही सातारा शहरातील रहिवाशी आहेत.
ता.१६ जुलै रोजी सायंकाळी जावळी तालुक्यातील एकीव धबधब्याजवळ अनोळखी तिघांनी इतर दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दरीत ढकलून दिले होते. यामध्ये अक्षय शामराव अंबवले ( वय २८, रा. बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) आणि गणेश अंकुश फडतरे (वय ३४, रा. करंजे पठे, सातारा) या दोघांचाही मृत्यू झाला होता.या घटनेची मेढा पोलिस ठाण्यात नोंद झाली होती.आसिफ माजीद शेख (वय २२), निखील राजेंद्र कोळकेर (वय २३) आणि साहिल मेहबूब शेख (वय १८, सर्व रा. भीमाबाई आंबेडकरनगर, सदर बझार सातारा) अशी त्यांची नावे आहेत.