देशातील पहिली खासगी रेल्वे आज शिर्डीत पोहचणार
देशातील पहिली खासगी रेल्वे साईनगरी शिर्डीत पोहचणार आहे. तामिळनाडूतील कोईम्बतुर स्थानकात मंगळवारी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. गुरूवारी शिर्डीत ही रेल्वे पोहचेल.भारत गौरव योजनेअंतर्गत रेल्वेने एका खासगी सर्व्हिस प्रोव्हायडरला दोन वर्षांच्या लीजवर दिली आहे. खासगीकरणातून धावणारी ही पहिली रेल्वे आहे. रेल्वेच्या कोचचे नुतनीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या दक्षिण विभागाने दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
हे आहे वैशिष्टय़

या स्पेशल रेल्वेला 20 डब्बे असून, 1500 लोक प्रवास करू शकतील.
महिन्यातून किमान तीन वेळा कोईम्बतूर-शिर्डी असा प्रवास असेल.
साईबाबा मंदिरात रेल्वे प्रवाशांना विशेष व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था असेल.
नियमित रेल्वे तिकीटांइतकाच या ट्रेनचा दर असेल. नॉन एसी- 2500, थर्ड एसी-5000, सेकंड एसी- 7 हजार तर फर्स्ट एसी- 10 हजार रुपये लागतील.