क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दी वर्ष सांगता | इस्लामपूर ते सिंदूर मशाल यात्रा

0
जत, संकेत टाइम्स : जत तालुक्यातील सिंदूर या महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रम निमित्ताने इस्लामपूर ते सिंदूर मशाल यात्रा काढण्यात आली. जत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मशाल यात्रा सिंदूर गावांत पोहचल्यानंतर क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सभा संपन्न झाली. सभेत क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या कार्याची माहिती वक्त्यांनी दिली. क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मीण यांचे कार्य महाराष्ट्र राज्यातील जत तालुक्यात असले तरी कर्नाटक राज्यात नाटक, सिनेमा यांच्या माध्यमातून भरपूर प्रसिद्धी झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांचे देश स्वांतत्र्यातील योगदान दुर्लक्षित राहिले आहे. यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव,प्रा.राजेंद्र कुंभार, डॉ. आर.के.पल्लकी,लक्ष्मीमण नाईक, राम नाईक,भीमगोंडा पाटील, के.डी.शिंदे,गंगप्पा हारुगेरी,प्रा.दादासाहेब ढेरे, आप्पासाहेब नामद,रविंद्र सोलनकर, अल्लाबक्ष मुल्ला, अर्जुन कुकडे, आवाण्णा कांबळे आदी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.