ओमानमधिल समुद्रातील बेपत्ता जतच्या तिघाचे मृत्तदेह सापडले

0
जत,संकेत टाइम्स : ओमान येथे गेलेल्यानंतर समुद्रात बेपत्ता झालेल्या जत तालुक्यातील तिघांचे मृतदेह ओमान प्रशासनाच्या हाती लागले आहेत. शशिकांत उर्फ विजय सिद्राम म्हमाणे (वय ४२) यांच्यासह मुलगा श्रेयश, मुलगी श्रुती अशी मृतांची नावे आहे. तिघांचाही मृत्यू झाल्याचे समजताच जतमधील शिवनगर परिसरात शोककळा पसरली.जतमधील शशिकांत म्हमाणे हे दुबई येथील एका कंपनीत नोकरीला होते.
रविवारी बकरी ईद असल्याने सुटी होती. त्यामुळे ते कुटुंबासह ओमान येथे समुद्रावर पर्यटनसाठी गेले होते.यावेळी त्यांची मुलगी श्रुती, मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले होते.त्यांना वाचविण्यासाठी शशिकांत म्हमाणे यांनी समुद्रात उडी मारली.दोन दिवस तिघेही बेपत्ता होते.त्यांचा शोध सुरु होता.अखेर बुधवारी तिघांचेही मृतदेह ओमान प्रशासनाला सापडले आहेत.

 

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.