नेपाळमध्ये भरले आंतरराष्ट्रीय बसवतत्त्व संमेलन

0
जत, संकेत टाइम्स : बसवतत्व जागतिक प्रसार आवश्यक आहे,त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी निरंतर आपले प्रसारकार्य सुरू ठेवावे,असे प्रतिपादन हुलसुरू गुरु बसवेश्वर संस्थान मठाचे डॉक्टर शिवानंद महास्वामीजी यांनी केले.
ते नेपाळ बीरगंज येथे आयोजित केलेल्या दोन दिवसाच्या आंतरराष्ट्रीय बसव संमेलनामध्ये बोलत होते.
प्रांरभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.

 

डॉ.शिवानंद महास्वामीजी पुढे म्हणाले,गुरु बसवेश्वरांनी आपल्या वचनाद्वारे समाज सुधारण्यासाठी बहुमूल्य देणगी दिली आहे.बसवतत्व व वचन साहित्य जागतिक स्तरावर प्रसार होण्यासाठी हे संमेलन आयोजित केलेले आहे.चार भाषेत भाषांतर केलेल्या वचनग्रंथ लोकार्पण करून बिहारचे लोखंड पप्पू यादव म्हणाले,मानवीयतेच्या कामाला व मानवधर्म यशस्वी होण्यासाठी सर्वांच्या हातभार लागणे अत्यंत आवश्यक आहे. संमेलनाच्या नियोजन केलेल्या पूज्यश्रीमहाजगद्गुरु चेन्न बसवानंद महास्वामीजी अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

 

पूजाश्री प्रभूलिंग महास्वामीजी, पूज्यश्रीमाते सत्यावती माताजी तसेच कलबुर्गीचे बसवराज देशमुख,डॉक्टर एन.के.पांडे,बिहार प्रतिनिधी एस.आर.कुमारदेव,डॉक्टर सुरेश पाटील,शरण दिनेश पटणे,नागनाथ पाटील,धर्मेंद्र पुजारी,मिरज राष्ट्रीय बसवदलचे सुभाष सायगाव असे हजारो शरणांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा,आंध्र प्रदेश,बिहार असे अनेक राज्यातील शरण- शरणी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला. नेपाळच्या जनतेला आकर्षित केलेल्या या संमेलनांची यशस्वी सांगता झाली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.