गृहमंत्रिपद मिळाले तर, सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू
अंबरनाथ: राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना, त्याबाबत अमित ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. गृहमंत्रिपद मिळाले तर, सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, असे अमित ठाकरे अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले.
तसेच गृहमंत्रिपदाची ऑफर हे वृत्त चुकीचे असल्याचे मी याआधीच स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.असे अमित ठाकरे अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले. तसेच गृहमंत्रिपदाची ऑफर हे वृत्त चुकीचे असल्याचे मी याआधीच स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.
