सांगली जिल्हाधिकारीपदी डॉ.राजा दयानिधी रूजू

0

 

सांगली,संकेत टाइम्स : सांगलीचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजा दयानिधी यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून पदभार स्वीकारला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे सर्व विभाग प्रमुखांनी स्वागत केले. त्यांनी यापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, मोहिनी चव्हाण, अरविंद लाटकर, दिपक शिंदे, सचिन बारावकर, अजयकुमार नष्टे,

 

Rate Card

उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, जोगेंद्र कट्यारे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, तहसिलदार डी. एस. कुंभार, गणेश शिंदे, किशोर घाडगे, रामलिंग चव्हाण, अनंत गुरव, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, अपर तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, पुनर्वसन अधिकारी तेजस्विनी पाटील आदि उपस्थित होते.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.