करजगीत जिन्नेसाहेब ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ
पॅनल प्रमुख शिवानंद अक्कलकोट म्हणाले, विरोधकांच्या टीका करण्यापेक्षा गाव विकास करण्यासाठी आमचे ध्येय असून आपण सर्व सुज्ञ मतदार असून खोटे माणसांचे मागे न राहता आमचे पॅनल साथ द्या,गावातील प्रंलबित प्रश्न सोडवू,असेही ते म्हणाले.
सरपंच पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन बालगाव म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.गावातील सर्व धर्माच्या देवस्थानासाठी निधी पुरवणे व जिल्हा परिषद शाळाचे बांधकाम बांधण्यासाठी पाऊल उचलणार शेतकरी असो महिला बचत गट जेष्ठ नागरिक अपंग व्यक्ती व गावातील पाण्याची सोय गटारची कामे लाईटची व्यवस्था वाडीवस्त्यावरील लोकांच्यासाठी रस्त्याची सोय करणार असे सांगितले.
बाबूगौडा पटेल म्हणाले, सहकारी सोसायटी प्रमाणे ग्रामपंचायत मध्येही बाजी मारूया.सर्व मतदारांनी आपल्या पँनेलच्या स्वच्छ,उच्चशिक्षित,लोकहितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना विजयी करावे.

सायबण्णा ककमरी म्हणाले,चोरांचे हातात गाव देण्यापेक्षा पोरांच्या हातात गाव द्या.विरोधकांनी अपप्रचार थांबवावा.गायरान हद्दीतील वास्तवास असलेल्या लोकांसाठी ग्रामसभेमध्ये ठराव करून त्यांना कायमस्वरूपी ती जागा द्यावी,त्यांच्या नावावर उतारा व्हावा.यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.त्यामुळे विकासाला प्राधान्य देणाऱ्या आमच्या पँनेलला साथ द्यावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद अक्कलकोट यांनी केली, आभार सुभाष बालगाव यांनी मानले.मोठ्या संख्येने यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.