शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे !

0
आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. देशातील ७० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. आज काळ बदलला आहे सर्वत्र स्पर्धा वाढली आहे. तसेच शेती व्यवसायात देखील अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. शेतीमालाला योग्य बाजारभाव न मिळणे हे शोकांतिका आहे.त्यामुळे शेती बेभरोशाची झाली आहे.आज शेतीला कष्टाशिवाय पर्याय नाही. शेतीत राबले तरच शेती व्यवसाय होत आहे.आज काळाच्या ओघात शेतीचे तुकडे झाले, खाणारे तोंडे वाढली हाताला काम कमी पडले, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळाचे पावले ओळखून शेती व्यवसायाकडे शेतीपूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे.

 

शेतीसाठी लागणारे योग्य नियोजन, कष्ट करण्याची तयारी , व्यवसायात झोकून देण्याची तयारी  यामुळे कोणताही व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांच्या हाताला दाम मिळेल. कुक्कुट पालन ,दुग्ध पालन व्यवसाया कडे वळल्यास शेतकऱ्यांना चांगले  सुगीचे दिवस येतील.आज दुग्ध व्यवसायात ग्राहकात जागरूकता वाढलेली आहे. गुणवत्ता तसेच दोन पैसे अधिक खर्च केल्यास शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायकडे पाहिले पाहिजे. आज दुग्ध व्यवसाय हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून पाहिला जात आहे. या क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत.

 

 

गाई म्हशींचे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन तसेच यांत्रिकीकरणाद्वारे दर्जेदार दुधाची निर्मिती यामुळे दुग्ध व्यवसायात चांगली संधी आहे. शेतकऱ्यांनी अध्यायावत आधुनिक तंत्राने दुग्ध व्यवसायात पशुखाद्यावर होणारे खर्चाचे व्यवस्थापन, जनावरांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन, कसे करता येईल याकडे पाहिले पाहिजे.दुग्ध व्यवसायातूनच शेणमुत्र, गोबर गॅस ,गांडूळ खताची निर्मितीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कष्टाची तयारी ठेवून आत्मविश्वासाने शेती पूरक व्यवसायाकडे उतरायला हवे. उत्तम गुणवत्ता हाच ध्यास असला पाहिजे. व्यवसायात नाविन्यता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कल्पनाशक्ती दूरदृष्टी आणि नेतृत्व गुण या या गुणांच्या आधारे आपण शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे.
Rate Card
संतोष दत्तू शिंदे
मु.पो. काष्टी.तालुका.श्रीगोंदा. जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र
मो.७९७२७४५०२५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.