कधी लावला जातो प्रतिबंधात्मक आदेश, वाचा सविस्तर

0

विविध आंदोलनेआगामी यात्रा, सण उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून तातडीच्या परिस्थितीत कलम १४४ अन्वये गंभीर आदेश दिले जाऊ शकतात. दंडाधिकारी किंवा राज्य सरकार सु मोटो किंवा परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर आदेश बदलू शकतात. जेव्हा कलम १४४ च्या आदेशामुळे सर्वसामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो तेव्हा वर्तमानपत्रात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये अधिकृतरीत्या आदेशाबाबत जारी केलेले निर्बंध आणि बंदी प्रकाशित करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

 

कलम १४४ नुसार पारित केलेला आदेश जास्तीत जास्त २ महिन्यांसाठी लागू केला जाऊ शकतो. राज्य सरकार हे जास्तीत जास्त ६ महिन्यांपर्यंत वाढवू शकते. आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई न्याय्य आहे कलम १४४ अंतर्गत. कायदेशीर उद्दीष्ट आणि एक योग्य तर्कसंगत हेतू साध्य करण्यास तात्काळ कोणताही धोका टाळण्यासाठी खाजगी अधिकार आणि स्वातंत्र्य यावर मर्यादा आणली जाऊ शकते.

 

विविध आंदोलनेआगामी यात्रा, सण उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम  37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 22 मार्च 2023 ते 4 एप्रिल 2023 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

        

Rate Card

या आदेशानुसार शस्त्रेसोटेतलवारीभालेदंडेबंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणेकोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणेदगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणेजमा करणे आणि तयार करणेव्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणेजाहीरपणे घोषणा करणेगाणी म्हणणेवाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणेफलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणेत्याचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

         

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारीधार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही.सांगली जिल्ह्यात हा आदेश दि. 22 मार्च 2023 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 4 एप्रिल 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहीलअसे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.