दुधाचे टँकर-दुचाकी धडकेत एकजण जागीच ठार

0

जत,संकेत टाइम्स : दुधाचा टँकर व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.जत शहरातील विजापूर – गुहागर राष्ट्रीय मार्गावर एमआयडीसीजवळ मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.पांडुरंग तुकाराम जानकर (वय ३७, रा. कंठी) असे मृत तरूणाचे नाव आहे.या घटनेची नोंद जत पोलिसांत झाली आहे.

 

हेही वाचा- आधी दिली अत्याचाराची तक्रार | दुसऱ्यादिवशी संशयित तरूणासह तक्रारदार महिला मृत्तावस्थेत आढळली

याबाबत अधिक माहिती अशी की,नागजफाट्याहून आलेला दुधाचा टँकर जत शहरालगतच्या‌ एमआयडीसी येथील चिंलिग प्लँन्टकडे जात होता.तर मयत पांडुरंग जानकर दुचाकीवरून आपल्या कंठी येथील घराकडे जात होता. यावेळी टँकर व मोटरसायकल यांच्यात अपघात झाल्याने जानकर हे रस्त्यावर आपटले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत  झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Rate Card

हेही वाचा- आईला बेशुध्द केले,आणि अवघ्या‌ चार महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरला

जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.दरम्यान नातेवाईकांची रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती.मयत पांडुरंग जानकर यांच्या मागे वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.