बालविवाह प्रकरणी पती,सासू-सासरे,आई-वडील विरोधात गुन्हा दाखल

0

जत,संकेत टाइम्स : पतीने वय कमी असतानाही लग्न केले,शारीरिक संबध ठेवले त्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षी पिडित पत्नीने एका मुलीस जन्म दिला आहे.शासकीय रुग्णालयात हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबधित पीडित पत्नीनेच पती,सासू-सासरे,आई-वडील यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दिल्यानंतर पोस्को बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने जत तालुक्यात खळबंळ उडाली आहे.

 

हेही वाचा-दुधाचे टँकर-दुचाकी धडकेत एकजण जागीच ठार

तालुक्यातील एका गावात पिडित अल्पवयीन मुलीचे जून २०२२ मध्ये लग्न लावण्यात आले होते.पिडित मुलीचे वय कमी असल्याची कल्पना होती.तरीही पती,सासू-सासरे,आई-वडील यांनी बालविवाह केला होता.त्यानंतर पतीने अल्पवयीन पीडिताशी शारिरीक संबध ठेवले.

Rate Card

हेही वाचा-कधी लावला जातो प्रतिबंधात्मक आदेश, वाचा सविस्तर

त्यामुळे पत्नीने १९ मार्चला शासकीय रुग्णालयात एका मुलीस जन्म दिला.हा प्रकार वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आली.त्यांनी पोलीसात माहिती दिली.पिडिताने याप्रकरणी पाच जणाविरूध फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.