शेतात जाणारा वहिवाटीचा रस्ता चार दिवसापुर्वी काकाने बंद केला याचा राग मनात धरून पुतण्याने डॉक्टर काकाचा खून केल्याची धक्कादायक घटना बेंळकी ता.मिरज येथे गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे.डॉ. सुनिल आप्पासाहेब गायकवाड (वय ५०, रा. गायकवाड मळा, बेळंकी) असे मृत्त काकाचे नाव आहे.संशयित पुतण्या जितेंद्र सर्जेराव गायकवाड (वय २७)याने बेळंकी-जानराववाडी रस्त्यावर गायकवाड वस्ती, कॅनॉलजवळ धारदार हत्यारांने वार करुन खून केला.याप्रकरणी मृत सुनिल यांचा मुलगा सत्यजित सुनिल गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी संशयित आरोपी जितेंद्र गायकवाड यास ताब्यात घेतले.
हेही वाचा-लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील खान्देशी भाषेत काय म्हणाल्या,बघा एका क्लिकवर
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,बेळंकीतील गायकवाड मळा परिसरात पशुवैद्यकतज्ञ सुनिल गायकवाड व जितेंद्र गायकवाड या काका पुतण्यांची शेतजमीन आहे. या जमीनीत ये-जा करण्यासाठी वहिवाटीच्या रस्त्याच्या अनेक दिवसापासून वाद होता.या वादातून डॉ. गायकवाड यांनी हा रस्ता चार दिवसापूर्वी बंद केला होता. याचा राग मनात धरून जितेंद्रने चिडून त्यांच्यावर धारदार शस्त्रांने हल्ला केला.यात त्यांना डोक्यात, तोंडावर व कपाळावर वर्मी घाव लागल्याने रक्तस्राव होऊन डॉ. सुनिल गायकवाड यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा-विजय ताड खूनप्रकरणी चार जणांना अटक,मुख्य सूत्रधार फरार
या घटनास्थळाची पोलिस उपाधीक्षक अजित टीके, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या सुचना दिल्या आहेत.हल्ल्यानंतर डाॅ.सुनिल यांची दुचाकी रस्त्यावर पडली होती. डॉ. गायकवाड यांच्यावर हल्ला केल्यानंंतर पुतण्या जितेंद्र गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याग पोलीसांनी ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.रागाच्या भरात पुतण्याकडूनच काकाचा खून केल्याच्या घटनेमुळे बेळंकीसह परिसरात खळबळ उडाली होती.घटनेमुळे शेतातील रस्ते,जमीन वाद कोणत्याही क्षणी विकोपाला जाऊ शकतो हे या घटनेने स्पष्ट झाले आहे.